ETV Bharat / state

परभणीत आणखी 28 जण कोरोनाबधित; 56 संशयित दाखल, तर तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 हजार 815 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 194 जिल्हा रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात दाखल असून, 767 जण विलगीकरण कक्षात आहेत. तर यापूर्वी 2 हजार 845 जणांनी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या 13 झाली आहे.

corona-in-parbhani
परभणीत आणखी 28 जण कोरोनाबधित
author img

By

Published : Jul 19, 2020, 7:41 AM IST

परभणी - गेल्या तीन आठवड्यात शनिवारी पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आढळून आली. मात्र, रात्री उशिरा पुन्हा गंगाखेड येथे आणखी 20 रुग्ण आढळून आल्याने शनिवारी एकूण 28 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 383 झाली आहे. तर शनिवारी 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र 3 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून, 56 संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत 8 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यात इनायत नगरात 1, गंगाखेड शहरातील देवळे जिनिंग भागातील 2, पूर्णा 1, मानवत शहर 2, पाथरीत 1 तर जिंतूर शहरात 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गंगाखेड शहरात झालेल्या रॅपिड अँटीजन तपासणीत 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गंगाखेड येथे शनिवारी 84 संशयित रुग्णांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली होती, ज्या माध्यमातून सदर 20 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार शनिवारी एकूण कोरोना बधितांची संख्या 28 एवढी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील आतापर्यंत आढळुन आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 383 झाली असून, त्यातील 176 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उर्वरीत 194 रुग्ण जिल्हा रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात शनिवारी आज 20 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. ज्यामध्ये परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट, परसावत नगर, पोलिस क्वार्टर, रविराज कॉर्नर, मोमीनपुरा-गांधीपार्क, कडबी मंडई, जागृती कॉलनी तसेच तालुक्यातील करडगाव, कारेगाव येथील 14 रुग्णांचा तर जिंतूर शहरातील वरूड वेस भागातील एक आणि हिवरखेड्यातील एक व सेलू शहरातील पारीख कॉलनी तसेच शास्त्री नगर व मोंढ्यातील प्रत्येकी एक या प्रमाणेच सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एक अशा एकूण 5 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 हजार 815 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 194 जिल्हा रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात दाखल असून, 767 जण विलगीकरण कक्षात आहेत. तर यापूर्वी 2 हजार 845 जणांनी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आतापर्यंत एकूण 4 हजार 131 जणांचे स्वॅब घेतल्या गेले असून, त्यातील 3 हजार 533 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर 383 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. अजूनही 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.

"24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू"

शनिवारी गंगाखेड येथील 55 वर्षीय तर परभणी येथील मुमताज कॉलनीतील 50 वर्षीय व्यक्तीचा परभणीच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात मृत्यू झाला. तर जिंतूर तालुक्यातील कावी येथील 70 वर्षीय बाधिताचा देखील शनिवारीच नांदेडात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या तीन जणांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या 13 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.