ETV Bharat / state

मुलीची छेड काढणे पडले महाग, आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास - परभणी

१९ नोव्हेंबर २०१६ ला पीडिता लहान बहिणीला शाळेतून आणण्यासाठी जात होती. यादरम्यान गावातील बाळू उर्फ तुकाराम विठ्ठलराव भुमरे (वय २१ वर्ष) याने मुलीचा पाठलाग करून वाईट हेतुने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

abuse
मुलीची छेड काढणे पडले महाग, आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास
author img

By

Published : Feb 4, 2020, 6:01 PM IST

Updated : Feb 4, 2020, 6:37 PM IST

परभणी - अल्पवयीन मुलीची वाटेत छेड काढणे एका रोडरोमिओला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी परभणी न्यायालयाने मुख्य आरोपी बाळू भुमरेला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

मुलीची छेड काढणे पडले महाग, आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास

हेही वाचा - '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'

ही घटना परभणी तालुक्यातील पिंगळी येथील असून याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पीडिता लहान बहिणीला शाळेतून आणण्यासाठी जात होती. यादरम्यान गावातील बाळू उर्फ तुकाराम विठ्ठलराव भुमरे (वय २१ वर्ष) याने मुलीचा पाठलाग करून वाईट हेतुने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर ताडकळस पोलीस ठाण्यात (गुरनं १७८ / १६ कमल ३५४ अ, २९४, ३२३, ३४ भादंवि आणि कलम ०८ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ प्रमाणे) बाळू भुमरेसह त्याचा साथीदार मुंजा उर्फ संजय राजाराम पिसाळ (वय २४ वर्ष) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - हिंगणघाट जळीत प्रकरण : पीडितेने रुग्णालयात नेताना व्यक्त केली होती 'ही' भावना

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक डी. एस. इंगळे आणि शेख वसीम शेख हारून यांनी करून आरोपी विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार परभणी सत्र न्यायालय हा खटला सुरू होता. या प्रकरणी सोमवारी बाळू भुमरेला दोन वर्ष सक्षम कारावासासह २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तर, त्याचा साथीदार मुंजा पिसाळ याला एक महिन्याच्या शिक्षेसह पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील दराडे यांनी पाहिले. तर कोर्ट पैरवीचे काम पोलीस कर्मचारी मारोती कुंडगीर यांनी केले.

Intro:परभणी - लहान बहिणीला शाळेतून घरी घेऊन येणाऱ्या अल्पवयीन मुलीची वाटेत छेड काढणे एका रोडरोमिओला महागात पडले आहे. या प्रकरणी परभणी न्यायालयाने या रोडरोमिओला दोन वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना परभणी तालुक्यातील पिंगळी येथील असून, या प्रकरणात ताडकळस पोलीस ठाण्यात 2016 ला गुन्हा दाखल झाला होता. या फैसल्यामुळे इतर रोडरोमिओंना चांगलाच दणका बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.Body:मौ.पिंगळी येथे एक 16 वर्षाची मुलगी 19 नोव्हेंबर 2016 रोजी तीच्या लहान बहीणीला शाळेतुन आणण्यासाठी जात होती. त्याच वेळी गावातील रोडरोमिओ बाळु उर्फ तुकाराम विठ्ठलराव भुमरे (वय 21 वर्ष रा. पिंगळी) याने मुलीचा पाठलाग करून वाईट हेतुने तीचा हात धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर मुलीच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात (गुरनं 178 / 16 कमल 354अ, 294, 323, 34 भादवी व कलम 08 बाललैंगीक अत्याचार प्रीतबंधक अधिनियम 2012 प्रमाणे) बाळु भुमरे व त्याचा साथीदार मुंजा उर्फ संजय राजाराम पिसाळ (वय 24 वर्ष, दोघे रा. पिंगळी) या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक डी. एस. इंगळे व शेख वसीम शेख हारून यांनी करून आरोपी विरूध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानुसार परभणी सत्र न्यायालय येथे हा खटला चालला. या प्रकरणी सोमवारी न्यायाधीशांनी मुख्य आरोपी बाळू भुमरे याला दोन वर्ष सक्षम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर त्याचा साथीदार मुंजा पिसाळ याला एक महिना शिक्षा आणि पाचशे रुपये दंड, अशी शिक्षा दिली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील दराडे यांनी पाहीले. तर कोर्ट पैरवीचे काम पोलीस कर्मचारी मारोती कुंडगीर यांनी केले.
दरम्यान देशभर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमुळे मोठे वादंग उठले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणी अद्यापही शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. अशा परिस्थितीत परभणी जिल्ह्यात मुलीची छेड काढली, म्हणून झालेली दोन वर्षांची शिक्षा महत्त्वाची ठरते. यामुळे रोडरोमिओ वचक निर्माण होईल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_court_judgment_vis_pkgConclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.