ETV Bharat / state

परभणी लोकसभेसाठी आतापर्यंत १३ उमेदवारी अर्ज दाखल, वंचित बहुजनसह भाकपही रिंगणात

सोमवारी अपक्ष उमेदवारांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत. भाकपचे नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला.

author img

By

Published : Mar 26, 2019, 11:38 AM IST

कॉ. राजन क्षीरसागर यांनी भाकपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला

परभणी - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. कालपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजन क्षीरसागर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांनी अर्ज दाखल केले.

सोमवारी अपक्ष उमेदवारांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत. भाकपचे नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यासह बहुजन सोशलिस्ट पक्षाचे यशवंत कसबे, बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेक इब्राहीम, अपक्ष संगिता निर्मल, डॉ. अप्पासाहेब कदम, सखाराम बोबडे, किशोर मुन्नेमाणिक यांनी अर्ज दाखल केले.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेचे संजय जाधव हे युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरतील. तर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर शरद पवार, उदयनराजे भोसले, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरतील.

Intro:परभणी - परभणी लोकसभा निवडणूकीसाठी आजपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादीसह इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 13 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. यामध्ये आलमगिर खान यांनी भारिप आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी 2 अर्ज भरले आहेत. तर भाकप चे राजन क्षीरसागर यांचा अर्ज भाकप नेते भालचंद्र कांगो यांच्या उपस्थतीमध्ये भरण्यात आला.Body:परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूकीची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उद्या (मंगळवारी) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी आज (सोमवारी) प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनी आपले अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे उद्या (मंगळवारी) शिवसेनेचे संजय जाधव यांचा आणखी एक अर्ज युवा सेनाप्रमुख अदित्य ठाकरे, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत भरला जाणार आहे. याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. दोन्ही पक्षांच्यावतीने रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल होणार आहेत. सकाळी शनिवार बाजार येथून मुख्य मार्गाने अदित्य ठाकरे यांची तर दुपारी शरद पवार यांची रॅली निघणार आहे. दरम्यान आज (सोमवारी) शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादी राजेश विटेकर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया राजन क्षीरसागर, बहुजन रिपब्लीकन सोशलिस्ट पार्टी यशवंत कसबे, बहुजन महापार्टी शेख सलीम शेख इब्राहीम, अपक्ष म्हणून संगिता निर्मल, डॉ. अप्पासाहेब कदम, सखाराम बोबडे, किशोर मुन्नेमाणिक यांचा तर आलमगिर महोम्मद खान यांनी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रत्येकी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आातापर्यंत 13 उमेदवारांचे 16 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे. उद्या मंगळवारी शेवटच्या दिवशी इच्छूकांची चांगलीच गर्दी पहायला मिळणार आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत 20 फोटो :- वंचित व भाकप चा अर्ज दाखल करताना उमेदवार.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.