ETV Bharat / state

विश्वचषकाचा अंतिम सामना कोण जिंकणार यावरुन वाद; मारहाणीत तरुणाचा मृत्यू, 'बंजारा टायगर्स' आक्रमक

Youth Murder on Ind vs Aus Match : विश्वचषकाचा अंतिम सामना कोण जिंकेल यावरुन बोईसरच्या एका केशकर्तनालयात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात अद्यापही आरोपींना अटक झालेली नसल्यानं आता बंजारा टायगर्स ही संघटना आक्रमक झाली आहे.

Fight Over World Cup Final Match
Fight Over World Cup Final Match
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 10:13 AM IST

पालघर Youth Murder on Ind vs Aus Match : विश्वचषकाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना बघताना झालेला वाद एका तरुणाच्या जिवावर बेतला आहे. प्रवीण राठोड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सामना बघताना दोघांनी केलेल्या बेदम मारहाणीत प्रवीणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपी फरार झाले आहेत.

सामना पाहताना सलूनमध्ये झाला वाद : विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना सुरू असताना बोईसरमधील चित्रालय परिसरातील एका केशकर्तनालयात प्रवीण राठोड आणि आरोपी मनोज गिरी आणि प्रतीक बसलेले होते. तिथं प्रवीण राठोड हा मोबाइलवर क्रिकेट सामना बघत होता. यावेळी आरोपींनी " तुम्हारा इंडीया हारेगा " असं म्हणून वाद घातला. सामन्यात कोण जिंकेल यावरुन झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला. यानंतर आरोपींनी त्यांच्या इतर मित्रांना बोलावून प्रविण राठोड याला मारहाण केली. यावेळी केशकर्तनालयातील खुर्चीचा एक भाग काढून गिरी यानं प्रवीणच्या डोक्यावर जबर मारहाण केली. त्यात गंभीर दुखापत झाल्यानं प्रवीणला प्रथम बोईसरच्या तारापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्यानं त्याला मीरा रोड येथील तुंगा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान 23 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांत तक्रार दाखल : याप्रकरणी प्रवीणच्या नातेवाईकानं बोईसर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी मनोज गिरी, प्रतीक गिरी आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भादंवी कलम 302 (34) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदण्यात आला आहे. मात्र याप्रकरणातील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

आरोपींच्या अटकेसाठी बंजारा टायगर्स आक्रमक : याप्रकरणात आरोपींना अद्यापही अटक झालेली नसल्यानं आता राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आक्रमक झाली असून त्यांनी पालघर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केलीय. तसंच आरोपीला अटक न झाल्यास धरणे आंदोलन केलं जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन
  2. Kanpur News : अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहताना एक चूक भोवल्यानं दोघांचा मृत्यू, नेमकी घडली कशी घटना?
  3. बिहारमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत खेळ! छठपूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.