पालघर/विरार - इस्टरच्या सणाला नवीन राणेभाट बेणपट्टी येथे राहणाऱ्या तरुणाचा दुचाकी घसरून मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवीन राणेभाट, बेणपट्टी येथे वास्तव्यास असणारे एल्फीन आलेक्स घोन्साल्वीस हा 28 वर्षीय तरूण रात्री दीडच्या सुमारास सत्पाळ येथून जाताना दुचाकी घसरून त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला प्रथम सत्पाळा येथील तेरेजा रूग्णालयात व नंतर संजीवनी रूग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्याची नोंद केल्यावर एल्फिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. दुपारी 4 वाजता नंदाखाल चर्च येथे त्याच्यावर अंत्यविधी करण्यात येणार येतील. त्याच्या पश्चात वडील आलेक्स, आई फिलोमीना व लहान बहीण तेजस्वी घोन्साल्वीस असा परिवार आहे. एल्फीन याचा वाडनिश्चय झाला होता.