ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात तरुणाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न; मारहाणीचा व्हिडिओ केला व्हाटसअॅप

शिर्डी नगर मधील साईकृपा ज्योती चाळीत राहणाऱ्या अमोद सभाजीत मिश्रा (52) यांचा मुलगा अजय मिश्रा याच्यासोबत रविवारी( 20 जून) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिषेक शर्मा याने भांडण केले होते. त्यानंतर हे दोघेही तेथून निघून गेले होते.

अपहरण करून खुनाचा प्रयत्न
अपहरण करून खुनाचा प्रयत्न
author img

By

Published : Jun 25, 2021, 7:37 AM IST

Updated : Jun 25, 2021, 9:05 AM IST

नालासोपारा (पालघर)- नालासोपारा पूर्वमधील एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपहरण झालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागला नाही. मात्र आरोपींनी अपहृत तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. याप्रकरणी अपहृत तरुणाच्या पालकांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अजय मिश्रा असे त्या अपहृत मुलाचे नाव आहे. पोलीस अजयचा शोध घेत आहेत.

तरुणाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न
शिर्डी नगर मधील साईकृपा ज्योती चाळीत राहणाऱ्या अमोद सभाजीत मिश्रा (52) यांचा मुलगा अजय मिश्रा याच्यासोबत रविवारी( 20 जून) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिषेक शर्मा याने भांडण केले होते. त्यानंतर हे दोघेही तेथून निघून गेले होते. हा प्रकार घडल्यानंतर रविवारी मध्यरात्री सव्वा अकराच्या सुमारास जावेद अन्सारी, अभिषेख शर्मा, अरुण सिंग तलवार, सचिन मोर्या, सूरज सिंग कनारसे, संजय सिंग मुन्नी हे सर्व जण अजयच्या घरासमोर आले आणि 'अजय किधर है, घरके बहार आ, आज तेरा पुरा मॅटर खतम करते है' असे धमकावून त्याच्या रुमची तोडफोड करून निघून गेले.

मिश्रा यांचा मुलगा रविवारी रात्री घरी आला नाही आणि त्याचा मोबाईलदेखील बंद होता. त्यानंतर सोमवारी दुपारी अजयच्या वडिलांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअपवर दोन व्हिडिओ आले. यामध्ये अजयला काठ्यांनी, लोखंडी रॉडने, मारहाण करताना दिसत होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मिश्रा यांनी तत्काळ तुळींज पोलीस ठाणे गाठून मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्हिडिओच्या अनुषंगाने आरोपींविरोधात गुन्हे दाखल करत अजयचा शोध सुरू केला.

रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत सापडला तरुण-

तुळींज पोलिसांनी सोमवारी रात्री 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास एक पोलीस उपायुक्त, एक सहायक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक, दहा अधिकारी आणि 65 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाळा नगर, शिर्डी नगर, संख्येश्वर नगर या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले आहे. शोध कार्यादरम्यान पोलिसांना जखमी तरुण महामार्गावर एक ढाब्याच्या नजीक सापडला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले.

मारहाण प्रकरणात तरुणीचाही समावेश-

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पूजा नलावडे (28) या वकील तरुणीला या घटनेत सहभागी असल्याच्या कारणावरून वसई येथून बुधवारी अटक केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांनी सांगितले. तर गुरुवारी तिला वसई न्यायालयात हजर केल्यावर 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. या गुन्ह्यातील बाकीचे आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी सात पोलीस टीम बनविण्यात आल्या असून सर्व आरोपींचा कसून शोध घेत तपास करत आहे.

Last Updated : Jun 25, 2021, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.