ETV Bharat / state

बिहारसाठी विशेष रेल्वे गाडी सोडा, बोईसरमध्ये कामगार रस्त्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

author img

By

Published : May 12, 2020, 2:01 PM IST

Updated : May 12, 2020, 3:40 PM IST

तारापूर औद्योगिक क्षेत्रात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातील लाखो कामगार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

worker demand special train for bihar  boisar worker on road  बोईसरमध्ये कामगार रस्त्यावर  तारापूर औद्योगिक क्षेत्र पालघर  पालघर लेटेस्ट न्युज  palghar latest news
बिहारसाठी विशेष रेल्वे गाडी सोडा, बोईसरमध्ये कामगार रस्त्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पालघर - लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात काम करणारे बिहार येथील हजारो कामगार अडकून पडले आहेत. बिहारसाठी विशेष गाडी सोडण्यात यावी, या मागणीसाठी या कामगारांनी रस्त्यावर उतरत आज बोईसर येथील तारापूर विद्यामंदिर शाळेच्या बाहेर एकच गोंधळ केला. यामुळे सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळाले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातील लाखो कामगार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी पायपीट करत आपल्या मूळगावी जाण्याचा रस्ता धरला होता. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनदरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पाठविण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानंतर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश येथील कामगारांसाठी पालघरमधून तीन रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, बिहारमधील कामगारांसाठी एकही रेल्वे सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे बिहारसाठीही प्रशासनाने विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करत शेकडो कामगारांनी बोईसर परिसरातील तारापूर विद्यामंदिर शाळेच्या बाहेर एकत्र येत एकच गोंधळ केला. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना कामगारांकडून हरताळ फासला गेला आहे.

Last Updated : May 12, 2020, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.