ETV Bharat / state

पतीला नको होते मुल, बाळाला जन्म देऊन महिलेची आत्महत्या

महिला गर्भवती असताना गर्भपात करावा, अशी तिच्या पतीची मागणी होती. मात्र महिलेला आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. या कारणावरून पती सातत्याने तिला त्रास देत होता.

author img

By

Published : Jun 27, 2019, 12:51 PM IST

Updated : Jun 27, 2019, 1:06 PM IST

बाळाला जन्म देऊन महिलेची आत्महत्या

पालघर - विमा क्षेत्रातील एका अधिकारी महिलेने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. ज्योतिबाला वर्मा असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महिला गर्भवती असताना गर्भपात करावा, अशी तिच्या पतीची मागणी होती. मात्र महिलेला आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. या कारणावरून पती सातत्याने तिला त्रास देत होता.

Woman commits suicide
ज्योतिबाला वर्मा आणि पती विमल वर्मा

या त्रासाला कंटाळून ज्योती पटनाहून वसई येथे आपल्या बहिणीच्या घरी आली. तेथे आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर तीन महिन्यांने तिने आत्महत्या केली. पटना येथील रहिवासी आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती हिचे लग्न नोव्हेंबर २०१७ मध्ये सालिमपुर अहरा येथील विमल वर्मासोबत झाले होते. मात्र त्यानंतर तिच्या माहेरून हुंडा म्हणून १० लाख रुपये आणि कार आणावी तसेच ज्योती गरोदर असताना तिने गर्भपात करावा, म्हणून सासरच्यांनी तिच्यावर दबाव आणला तसेच मारहाणही केली. या सर्व जाचाला कंटाळून ज्योती बहिणीच्या घरी आली. आपल्या मुलाला जन्म दिला, आता हे मुल तीन महिन्यांचे आहे. मात्र जोतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Woman commits suicide
ज्योतिबाला वर्मा आणि पती विमल वर्मा

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने आपल्या सासरच्या लोकांना जबाबदार धरले असून आपल्या मुलाला न्याय मिळावा, असे नमूद केले आहे. ज्योतीचे पती विमल वर्मा, सासरे विजयकुमार, सासू मीराशरण, नणंद दीपा आणि तिचे पती अविनाश, दुसरी नणंद विजेता वर्मा अशा सासरच्या ६ जणांविरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ज्योतीच्या सासरची मंडळी फरार असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वालीव पोलीस ठाणे

Intro:पतीला नको होते मुल, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Body:पतीला नको होते मुल, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

नमित पाटील,

पालघर, दि.27/6/2019

विमाक्षेत्रातील एका अधिकारी महिलेने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. ज्योतिबाला वर्मा असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महिला गर्भवती असताना गर्भपात करावा अशी तिच्या पतीची मागणी होती, मात्र महिलेला आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. या कारणावरून पती सातत्याने तिला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून ज्योती पटनाहून वसई येथे आपल्या बहिणीच्या घरी आली, तेथे आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिने आत्महत्या केली.

पटना येथील रहिवासी व इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती हिचे लग्न नोव्हेंबर 2017 रोजी सालिमपुर अहरा येथील विमल वर्मा सोबत झाले होते. मात्र त्यानंतर तिच्या माहेरून हुंडा म्हणून १० लाख रुपये व बलेनो कार आणावी तसेच मयत हिने आपला पगार आरोपींना द्यावा. तसेच ज्योती गरोदर असताना तिने गर्भपात करावा म्हणून तिला सासरच्यांनी तिच्यावर दबाव आणला तसेच मारहाणही केली. या सर्व जाचाला कंटाळून ज्योती वसई पूर्वेकडील ऍव्हेन्यू इमारत १७ मधूबन टाऊनशिप येथे बहिणीच्या घरी कडे आली आपल्या मुलाला जन्म दिला, आता हे मुल तीन महिन्यांचे आहे. मात्र जोतीने पंख्याला गळफास घेउन आत्महत्या केली.

सुसाइड नोट मधील पत्रात तिने आपल्या सासरच्या लोकांना जबाबदार धरले असून आपल्या मुलाला न्याय मिळावा असे नमूद केल्याचे कळते. ज्योतीचे पती विमल वर्मा, सासरे विजयकुमार, सासू मीराशरण, नणंद दीपा व तिचे पती अविनाश, दुसरी नणंद मोनी उर्फ विजेता वर्मा अशा सासरच्या 6 जणांविरोधात छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ज्योतीच्या सासरची मंडळी फरार असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Conclusion:
Last Updated : Jun 27, 2019, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.