ETV Bharat / state

'स्थानिक जनतेला वाढवण प्रकल्प नको असल्यास आम्ही जनतेसोबत' - palghar

मच्छीमारांच्या डिझेल परताव्याचे वाटप कालबद्ध पद्धतीने व्हावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. डिझेल परताव्याच्या निधीतील मोठी रक्कम दुर्दैवाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आल्याने पालघरला कमी निधी मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने लक्ष घालण्याचे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी महामेळाव्यात दिले.

pravin darekar comment
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Feb 13, 2020, 9:37 AM IST

पालघर- वाढवण बंदर अथवा अन्य कोणताही प्रकल्प स्थानिक जनतेची हानी होईल या हेतूने राबविण्यात येत नाही. वाढवण बंधाऱ्याला जर जनतेचा विरोध असेल, तर या प्रकल्पाची संपूर्ण माहिती, प्रकल्पाचे फायदे जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठलेही सरकार जनतेच्या रेट्या पलीकडे जाऊन काम करत नाही. स्थानिक जनतेला व राज्यातील सरकारला हा प्रकल्प नको असल्यास आम्हीही जनतेसोबत राहू, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

माहिती देताना विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर

केंद्र सरकारने नुकताच वाढवण बंदर प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाविषयी प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संबंधित प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील दांडी येथे मंगळवारी कोळी महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना आखण्यासाठी मच्छीमार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्यानिमित्त प्रसिद्ध केलेल्या आमंत्रण पत्रिकेवर असलेल्या समस्यांपैकी अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले. तर, मच्छीमारांच्या डिझेल परताव्याचे वाटप कालबद्ध पद्धतीने व्हावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. डिझेल परताव्याच्या निधीतील मोठी रक्कम दुर्दैवाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आल्याने पालघरला कमी निधी मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने लक्ष घालण्याचे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी महामेळाव्यात दिले.

हेही वाचा- नालासोपाऱ्यात फेरीवाल्याची वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.