विरार(पालघर) - विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीनंतर ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. आगीत पती गेल्याचे समजताच रुग्णाच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चांदणी दोशी असलेल्या निधन महिलेचे नाव आहे.
कुमार दोशी हे 45 वर्षीय रुग्ण हे विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात उपचार घेत होते. गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये आग लागली होती. या आगीत कुमार दोशी यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना त्यांच्या पत्नीला चांदनी दोशी यांना समजताच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर जिवदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मृत दोशी कुटुंब वसईच्या १०० फूट रोड परिसरात रहात होते.
हेही वाचा-राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा - भाजपचे नेते किरीट सोमैया
रुग्णालयातील आगीच्या घटनेने पती-पत्नीचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या आगीत 13 रुग्ण दगावल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शहा यांनी दिली आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा-'ही काही नॅशनल न्यूज नाही'; राजेश टोपे यांचे बेजबाबदार विधान
रात्रीच आगीवर नियंत्रण-
आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले होते. विजय वल्लभ रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाची स्वत:ची आगीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला
Maharashtralockdown : राज्यात कडक निर्बंध लागू, अशी आहे नवीन नियमावली
गोव्यात नाईट कर्फ्यू लागू, अशी आहे नवीन नियमावली
आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री
कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार