पालघर Narayan Rane On Shankaracharya : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय. मात्र या सोहळ्यावरून देशात राजकारण तापलं आहे. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नसताना भाजपाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठापणा करण्याची घाई झाल्याचा आरोप सुरू आहे. (Narayan Rane) शंकराचार्यांनी अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करणं चुकीचं असल्याचं म्हटल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचं योगदान काय? असा सवाल विचारला.
राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, याचं त्यांना कौतुक नाही. हे आतापर्यंत कोणीही करु शकले नाही. हा विषय कोणीही घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. हे राजकीय दृष्टीतून राम मंदिर होत नाही. ते धार्मिक दृष्टीने होत आहे. राम आमचा देव आहे. त्याच्यासाठी हे सर्व सुरु आहे. आम्हाला रामाचे दर्शन घेता येणार आहे. याचं आम्हाला समाधान आहे. शंकराचार्यांनी मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की, त्याच्यावर टीका करावी?.शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचं योगदान काय आहे सांगावं ? - नारायण राणे, केंद्रीय मंत्री
राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध : केंद्रीय मंत्री राणेंच्या या वक्तव्यावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्यावर कोंबडी आणत काँग्रेसकडून आज (14 जानेवारी) आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, "प्रभू श्रीराम आमचे आहेत. आमच्या नसा-नसात प्रभू राम आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येला जाऊन कुलूप काढून मंदिर दर्शनासाठी खुल केलं होतं. तसंच तेव्हा त्यांनी देशात रामराज्य आणू, अशी घोषणा केली होती. मात्र, भाजपा लोकांच्या भावनांचा वापर करत निवडणूक लढवत आहेत. तसंच नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. नारायण राणे आणि मुलांनी राजकारणाचा स्थर खाली आणण्याचं काम केलंय. भाजपाने त्यांना भुंकण्यासाठी ठेवलं आहे. मोदी हे शंकराचार्यांपेक्षा मोठे असल्याचं जर दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे निषेधार्ह असल्याचंही आमदार धंगेकर म्हणाले.
हेही वाचा -