ETV Bharat / state

घोलवड समुद्रकिनारी आढळला व्हेल मासा; बचावकार्य सुरू असतानाच मृत्यू

डहाणू तालुक्यातील घोलवड समुद्रकिनारी रविवारी व्हेल मासा भरतीच्या पाण्यासह किनाऱ्यापर्यंत आला. मात्र, आहोटी सुरू झाल्याने या माशाला दगडी भागातून माघारी समुद्रात परतता आले नाही. अजित माच्छी यांच्या पारंपरिक मत्स्यशेतीत हा मासा असल्याचे कळताच माच्छी आणि तेथील स्थानिक मच्छिमार माशाच्या मदतीकरता समुद्रकिनारी पोहोचले.

Whale fish died
व्हेल माशाचा मृत्यू
author img

By

Published : May 25, 2020, 12:07 PM IST

पालघर - घोलवड समुद्रकिनारी ९ फूट लांबीचा जिवंत व्हेल मासा आहोटी लागल्याने किनाऱ्यावरच अडकला. याची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी त्याचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या माशाला समुद्रात सोडण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

डहाणू तालुक्यातील घोलवड समुद्रकिनारी रविवारी व्हेल मासा भरतीच्या पाण्यासह किनाऱ्यापर्यंत आला. मात्र, आहोटी सुरू झाल्याने या माशाला दगडी भागातून माघारी समुद्रात परतता आले नाही. अजित माच्छी यांच्या पारंपरिक मत्स्यशेतीत हा मासा असल्याचे कळताच माच्छी आणि तेथील स्थानिक मच्छिमार माशाच्या मदतीकरता समुद्रकिनारी पोहोचले. त्यानंतर लगेचच वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या (डब्ल्यूसीएडब्ल्यूए) सदस्यांना बोलण्यात आले.

व्हेल माशाला वाचविण्यासाठी पाण्यात ठेवणे आवश्यक असल्याने झाल्याची झोळी करून पाणी असलेल्या खड्ड्यात या माशाला ठेवले. भरती आल्यावर त्याला पाण्यात सोडून देण्याचा निर्णयही घेतला गेला. परंतु, भरती येण्याकरता दोन ते तीन तासांचा अवधी लागणार होता. अशात या माशाने खड्ड्यातील पाण्यातच काही वेळ पोहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो शांत पडून राहिला. डब्ल्यूसीएडब्ल्यूए संस्थेचे सदस्य रेमंड डिसोझा घटनास्थळी आल्यावर मासा मृत झाल्याचे त्यांनी मच्छिमारांना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.