पालघर - माहीम येथील समुद्रकिनारी एक व्हेलमासा मृतावस्थेत आढळून आला आहे. मात्र, या मृत व्हेलमाशामुळे माहीमच्या समुद्र किनारी दुर्गंधी पसरली आहे. या मृत व्हेलमाशाची लांबी सुमारे ३० ते ४० फूट असून रुंद १० ते १० फूट आहे.
माहीम, नांदगाव, मुरबे या परिसरात बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी सोडले जाते. यामुळे या माशाचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे.