पालघर - वसई- विरार शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे विरार ते वसई दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; १३०० नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी
रेल्वे सेवा बंद करण्यात आल्यामुळे हजारो प्रवासी वसई रेल्वे स्थानकात ताटकळून होते. अनेक तासानंतर कोणतीही वाहतुकीची सुविधा नसल्याने प्रवाशांनी पायीच ट्रॅकमधून चालत जाण्याचा मार्ग अवलंबला. यावेळी हजारोच्या संख्येने प्रवाशांनी रेल्वे ट्रकवर उतरून भरपावसात पायी प्रवास केला. वसई ते चर्चगेटदरम्यान पश्चिम रेल्वे सेवा उशीराने सुरू आहे.
हेही वाचा- मुंबईत पावसाच्या जोरदार पुनरागमनाने रेल्वे सेवा पुन्हा ठप्प, 'या' गाड्या झाल्या रद्द