ETV Bharat / state

विरार : रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण, गुन्हा दाखल - रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ विरार

विरार पूर्वमध्ये असलेल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेला अशक्तपणा आल्याने, तिच्या कुटुंबीयांनी या महिलेला बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर टेस्टदरम्यान रुग्णाच्या नाकात घातलेल्या स्टिकचे टोक नाकातच तुटल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. या कारणावरून या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

author img

By

Published : May 23, 2021, 3:19 PM IST

Updated : May 23, 2021, 4:04 PM IST

विरार (पालघर) विरार पूर्वमध्ये असलेल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेला अशक्तपणा आल्याने, तिच्या कुटुंबीयांनी या महिलेला बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर टेस्टदरम्यान रुग्णाच्या नाकात घातलेल्या स्टिकचे टोक नाकातच तुटल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. या कारणावरून या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

डॉक्टरांना मारहाण

रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ देखील केली. याबाबत डॉक्टर जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांना आडवून मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. या प्रकरणी डॉक्टर श्रीराम अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात रुग्णाच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - तौक्ते वादळातील नुकसानीच्या भरपाईत सरकार भेदभाव करणार नाही - नाना पटोले

Last Updated : May 23, 2021, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.