ETV Bharat / state

विरारच्या डी-मार्टमध्ये दहशतवादी पकडल्याची अफवा

ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे फक्त पोलिसांचे 'मॉकड्रिल ऑपरेशन' असल्याचेही सांगण्यात आले.

व्हिडीओतील काही दृश्य
author img

By

Published : Feb 15, 2019, 3:39 PM IST

वसई - विरार पश्चिमेच्या डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा आणि दहशतवादी पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे फक्त पोलिसांचे 'मॉकड्रिल ऑपरेशन' असल्याचेही सांगण्यात आले.

व्हिडीओ
undefined

गुरुवारी सायंकाळपासून वसई विरारमध्ये सोशल मीडियावर विरार येथील डी-मार्टमध्ये दहशतवादी पकडल्याची माहिती व्हायरल होत होती. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. डी-मार्टमध्ये झालेली ही घटना कोणतीही कारवाई नसून अर्नाळा पोलिसांचे मॉकड्रील ऑपरेशन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये एखाद्या आरोपीला कशाप्रकारे अटक केली जाते, त्याच्यावर पोलीस कारवाई कशी केली जाते, तसेच एखाद्या प्रकरणात पोलीस किती तत्परता दाखवते याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात येते. मात्र, पोलिसांच्या या प्रात्यक्षिकांचा काही व्यक्तींनी व्हिडिओ बनवून अफवा पसरवण्याचे काम केले आहे. यात काहींनी बॉम्ब, तर काहींनी दहशतवादी पकडल्याचे मॅसेज पसरवले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Intro:विरारच्या डिमार्टमध्ये दहशतवादी पकडल्याची अफवा ( ब्रेकिंग)
प्रतिनिधी, वसई :
विरार पश्चिमेच्या डिमार्टमध्ये बॉम्ब असल्याची तसेच दहशतवादी पकडल्याची व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले. तर हे पोलिसांचे मॉकड्रिल ऑपरेशन होते. Body:गुरुवारी सायंकाळ पासून वसई विरार मध्ये सोशल मीडियावर विरार येथील डिमार्ट मध्ये आतंकवादी पकडल्याची माहिती व्हायरल होत होती. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की, डिमार्टमध्ये झालेली हि घटना कोणतीही कारवाई नसून अर्नाळा पोलिसांचे मॉक ड्रील ऑपरेशन होते. यामध्ये एखाद्या आरोपिला कशाप्रकारे अटक केले जाते. त्याच्यावर पोलीस कारवाई कशी केली जाते. त्यासह एखाद्या प्रकरणात पोलीस किती तत्परता दाखवते याबाबतचा प्रात्यक्षिक सुरु होते. मात्र पोलिसांच्या या प्रात्यक्षिकांचा काही व्यक्तींनी व्हिडीओ बनवून अफवा पसरवण्याचे काम केले आहे. यात काहींनी बॉंब तर काहींनी दहशतवादी पकडल्याचे मेसेज पसरवले असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. Conclusion:अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.