ETV Bharat / state

पालघर विधानसभा : वाढवण बंदराविरोधात ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

author img

By

Published : Oct 23, 2019, 6:13 PM IST

जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर बांधण्याचा शासनाचा प्रयत्न असून या बंदराला स्थानिक मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांचा तीव्र विरोध केला आहे. या बंदराचा विरोधात चिंचणी, वरोर, वाढवण, वासगाव तणाशी, तडीयाळे, गुंगवाडा, अब्राहम धूमकेत, डहाणू खाडी या गावांमधील 34 मतदान केंद्रांवर अत्यंत कमी प्रमाणात मतदान झाले आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघात वाढवण बंदर विरोधात ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

पालघर - प्रस्तावित वाढवण बंदराविरुद्ध पालघर विधानसभा मतदार संघातील डहाणू ते केळवे या किनारपट्टीलगत असलेल्या गावांतील सुमारे 43 हजार मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांना हा सुचक इशारा असल्याचे या गावातील नागरिकांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर बांधण्याचा शासनाचा प्रयत्न असून या बंदराला स्थानिक मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांचा तीव्र विरोध केला आहे. या बंदराचा विरोधात चिंचणी, वरोर, वाढवण, वासगाव तणाशी, तडीयाळे, गुंगवाडा, अब्राहम धूमकेत, डहाणू खाडी या गावांमधील 34 मतदान केंद्रांवर अत्यंत कमी प्रमाणात मतदान झाले आहे. या प्रास्तवित बंदराविरुद्ध दांडी, उच्छेळी, सातपाटी, वडराई या मच्छीमार गावांमध्येही मतदानावर परिणाम झाला आहे. 55 बूथ मधील 45,322 मतदारांपैकी फक्त 3677 मतदारांनी (8.02 टक्के) मतदान केले. यापैकी 10 बूथवर 0 टक्के मतदान झाले असून 27 बूथवर 5 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. या गावांमधील नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने हा निर्णय घेतला. या बहिष्कारासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाली असून त्याची आता तरी दखल प्रशासन घेईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र विधानसभा : पालघर जिल्ह्यात मतदारांचा कौल कोणाला

1995 मध्ये या बंदर उभारणीचा प्रस्ताव प्रथम मांडण्यात आला होता. त्याप्रसंगी स्थानिकांकडून झालेल्या विरोधाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेऊन उद्धव ठाकरे यांना लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा रेटून नेण्याचा घाट बांधला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध पाहून 2016 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत, मे 2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत तसेच 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आपण जनतेसोबत राहु" असे जाहीर आश्वासन प्रचारसभेमध्ये दिले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार सभांमध्ये भाषण करताना निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांना वाढवण येथे पाठवू आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेऊ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच्या काळात शिवसेनेला आपल्या नेते मंडळींना वाढवण येथे पाठवले नाही. असे असताना आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनोर येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा तशाच प्रकारचे आश्वासन देणारे वक्तव्य केले. परंतु ठोस अशी भूमिका स्पष्ट केली नाही.

हेही वाचा - एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी; गुन्हा दाखल

वाढवण परिसरातील गावांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असून चिंचणी आणि धाकटी डहाणू येथे भाजपची संघटनात्मक बांधणी आहे. युतीच्या घटक पक्षांचे प्राबल्य असलेल्या गावांमध्ये मतदारांनी उस्फूर्तपणे निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार, हा शिवसेना आणि भाजपसाठी सूचक संदेश असल्याचे मानले जात आहे. स्वयंस्फूर्तीने झालेल्या कृतीनंतर शिवसेनेच्या नेत्यांना या बंदराविषयी पुन्हा येथील नागरिकांचे मत आजमावण्याची स्वतंत्रपणे गरज आहे काय? असे वाढवण बंदर विरोधी कृती समस्यांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा दरम्यान डहाणू आणि जव्हार येथे जाहीर सभांमध्ये वाढवण बंदरा विषयी वक्तव्य करण्याचे टाळले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी येथील अनेक मतदारांनी शासकीय मतदार स्लिप स्वीकारल्या नाहीत. तसेच कोणत्याही पक्षाचे पोलिंग बूथ उभारण्यात आले नसल्याचे दिसून आले होते. यावरून या गावातील नागरिकांचे बंदर विरोधी असलेल्या तीव्र भावनांची आगामी काळात स्थापन होणारे सरकार दखल घेईल का? असा सवाल बहिष्कार टाकणार्‍या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:पालघर विधानसभा मतदारसंघात किनारपट्टीवरील गावांचा मतदानावर बहिष्कार टाकून शासनाला वाढवण बंदर विरोधात सूचक संदेशBody:पालघर विधानसभा मतदारसंघात किनारपट्टीवरील गावांचा मतदानावर बहिष्कार टाकून शासनाला वाढवण बंदर विरोधात सूचक संदेश

नमित पाटील,
पालघर, दि. 23/10/2019

     प्रस्तावित वाढवण बंदराविरुद्ध पालघर विधानसभा मतदार संघातील डहाणू ते केळवे या किनारपट्टीलगत असलेल्या गावांतील सुमारे  43 हजार मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या घटनेमुळे शिवसेना व भाजपा या सत्ताधारी पक्षांचे इतर पक्षांना सूचक संदेश बंदराला विरोध करणाऱ्या नागरिकांकडून देण्यात आला आहे.

     पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर बांधण्याचा शासनाचा प्रयत्न असून या बंदराला स्थानिक मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांचा तीव्र विरोध केला आहे. या बंदराचा विरोधात चिंचणी, वरोर, वाढवण, वासगाव तणाशी, तडीयाळे, गुंगवाडा, अब्राहम धूमकेत, डहाणू खाडी अशा दहा-बारा गावांमधील 34 मतदान केंद्रांवर अत्यल्प प्रमाणात मतदान झाले. त्याचप्रमाणे या प्रास्तवित बंधारा विरुद्ध दांडी, उच्छेळी, सातपाटी, वडराई या मच्छीमार गावांमधील देखील मतदानावर परिणाम झाला. या स्वयंस्फूर्तीने मतदान बहिष्काराचा प्रक्रियेत 55 बूथ मधील 45,322 मतदारापैकी फक्त 3677 नागरिक (8.02 टक्के) सहभागी झाले. या पैकी 10 बूथवर 0 टक्के मतदान झाले असून 27 बूथवर 5 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी कोणत्याही संघटना किंवा व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागला नाही, स्थानिकांनी नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने हा निर्णय घेतला.. हे विशेष! या बहिष्कारासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाली असून त्याची आता तरी दखल शासन व प्रशासन घेईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

   1995 मध्ये या बंदर उभारणीचा प्रस्ताव प्रथम मांडण्यात आला होता. त्याप्रसंगी स्थानिकांकडून झालेल्या विरोधाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन उद्धव ठाकरे यांना लोकांचे मत आजमावण्यासाठी पाठवले होते, त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर भाजपा सरकारने हा प्रकल्प पुन्हा रेटून नेण्याचा घाट बांधला. या प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध पाहून 2016 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत, मे  2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत तसेच 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आपण जनतेसोबत राहु" असे जाहीर आश्वासन प्रचारसभेमध्ये दिले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार सभांमध्ये भाषण करताना निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांना वाढवण येथे पाठवू व लोकांचे मत पाहून घेऊ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र लोकसभा व विधानसभेच्या दरम्यानच्या काळात शिवसेनेला आपल्या नेते मंडळींना वाढवणं येथे पाठवायला जमले नव्हते. असे असताना आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनोर येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा तशाच प्रकारचे आश्वासन देणारे वक्तव्य केले, मात्र ठोस अशी भूमिका स्पष्ट केली नाही.

  वाढवण परिसरातील गावांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असून चिंचणी व धाकटी डहाणू येथे भाजपाचाची संघटनात्मक बांधणी आहे. युतीच्या घटक पक्षांच्या प्राबल्य असलेल्या गावांमध्ये मतदारांनी उस्फूर्तपणे निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार, हा शिवसेना व भाजपा साठी सूचक संदेश असल्याचे मानले जात आहे. स्वयंस्फूर्तीने झालेल्या कृतीनंतर शिवसेनेच्या नेत्यांना या बंदराविषयी पुन्हा येथील नागरिकांचे मत आजमावण्याची स्वतंत्रपणे गरज आहे काय?असे वाढवण बंदर विरोधी कृती समस्यांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा दरम्यान डहाणू व जव्हार येथे जाहीर सभामध्ये मार्गदर्शन करताना वाढवण बंदराचा विषयी वक्तव्य करण्याचे टाळले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी येथील अनेक मतदारांनी शासकीय मतदार स्लीप स्वीकारल्या नाहीत तसेच कोणत्याही पक्षाचे पोलिंग बूथ उभारण्यात आले नसल्याचे दिसून आले होते. यावरून या गावातील नागरिकांचे बंदर विरोधी असलेल्या तीव्र भावनांची आगामी काळात स्थापन होणारे सरकार दखल घेईल का असा सवाल बहिष्कार टाकणार्‍या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.