पालघर - राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी (ता.२४) जाहीर झाले. जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा भार ६ पोलीस अधिकारी आणि २०० पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला.
हेही वाचा - नगरमध्ये हातकणंगले पॅटर्न : राम शिंदेंनी रोहित पवार यांना बांधला 'विजयी' फेटा
जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मसदारसंघाची मतमोजणी जव्हार मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे झाली. या ठिकाणी 200 पोलीस कर्मचारी आणि सहा पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. एवढ्या कमी पोलीस बळावर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ देता पोलिसांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. याबद्दलची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनावणे यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.