ETV Bharat / state

वसईत पित्याने मुलीच्या लग्नानिमित्त आहेराच्या पैशांसह 11 लाख रुपये केले रुग्णालयाला दान - पालघर वसई ख्रिस्ती लग्नसोहळा न्यूज

मुलीच्या लग्नात आलेला पाच लाखांचा आहेर समाज कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्यांनी घेतला. त्याचप्रमाणे पीटर यांनी आपल्याकडील आणखी सहा लाख रूपयांची आहेरातील पैशात भर घालत एकूण अकरा लाख रुपयांचा धनादेश मुलीच्या लग्नाप्रीत्यर्थ वसईतील कार्डीनल ग्रेशियस रुग्णालयाला मदत म्हणून दिला.

वसई लग्नाच्या आहेराचे पैसे रुग्णालयाला दान न्यूज

author img

By

Published : Feb 12, 2021, 1:14 PM IST

वसई (पालघर) - लग्न म्हटले की, जवळ पैसा असो वा नसो, पैपाहुण्यांना आहेर, मान्यवरांना फेटे आणि डॉल्बीचा दणदणाट असा काहींसा माहोल असतो. जावळ, वास्तुशांती सारख्या कार्यक्रमातही वारेमाप खर्च करणारी मंडळी मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, वसईतील एका पित्याने मुलीच्या लग्नसोहळ्यात आलेल्या आहेरात पदरच्या आणखी पैशांची भर घालत रुग्णालयाला आर्थिक मदत केली आहे. यातून त्यांनी समाजापुढे आदर्शच ठेवला आहे.

वसई : वधूपित्याकडून लग्नाच्या आहेराचे पैसे रुग्णालयाला दान
वसईत पित्याचा अनोखा आदर्श

ख्रिस्ती बांधवांचे लग्नसोहळेदेखील मोठ्या थाटात पारंपारिक पद्धतीने साजरे होत असतात. कोणत्या गोष्टींवर कोणी किती आणि कसा खर्च करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यावर आपण खर्च करणार आहोत, असा कोणताही कार्यक्रम पुढील आयुष्यासाठी आठवणीतून प्रेरणादायी ठरावा, यासाठी वसईतील वाघोली गावातील पीटर फर्नांडिस यांनी एक वेगळाच आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. तानिया या त्यांच्या मुलीचा माणिकपूर येथील मार्क डाबरेसोबत लग्न सोहळा आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. लग्नानंतर आलेल्या आहेराची पाकिटे फोडली असता, तब्बल पाच लाख रूपये आहेर तानियाला भेटीदाखल आला होता. पीटर फर्नांडिस सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.

पाच लाखांच्या आहेरात सहा लाखांची भर घालून केली रुग्णालयाला मदत

मुलीच्या लग्नात आलेला पाच लाखांचा आहेर समाज कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्यांनी घेतला. त्याचप्रमाणे पीटर यांनी आपल्याकडील आणखी सहा लाख रूपयांची आहेरातील पैशात भर घालत एकूण अकरा लाख रुपयांचा धनादेश मुलीच्या लग्नाप्रीत्यर्थ वसईतील कार्डीनल ग्रेशियस रुग्णालयाला मदत म्हणून दिला. या वेळी, पीटर फर्नांडिस, मोनिका फर्नांडिस, फादर अंब्रोज फर्नांडिस, तानिया फर्नांडिस-डाबरे, मार्क डाबरे, कार्डीनल ग्रेशियस रूग्णालयाचे चेअयमन अ‌ॅन्सन परेरा, थाॅमस ब्रिटो, युरी गोन्सालवीस आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.