ETV Bharat / state

पालघर : भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील व्हिडिओ व्हायरल - भाजप

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
author img

By

Published : Apr 2, 2019, 1:27 PM IST

पालघर - पालघरमध्ये भाजपचा उमेदवार निवडुन येऊ शकेल, असे वातावरण असून कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. पालघरची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील व्हायरल व्हिडीओ.

पालघरच्या जागेसाठी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत युतीच्या सभा, मेळाव्याला न जाण्याचा निर्णय गुरुवारी डहाणू-सरावली येथे भाजपच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आहे. त्यामुळे पक्षातील बंड समोर आले आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. नगराध्यक्ष भरत राजपूत, आदिवासी आघाडी प्रमुख हरिश्चंद्र भोये, लुईस काकड, नंदकुमार पाटील, विना देशमुख महीला आघाडी प्रमुख, सरपंच सुरेश शिंदा, जगदिश राजपूत, विवेक कोर आदी या सभेत उपस्थित होते.

राजेंद्र गावितांना निवडणूक अडचणीची ठरणार

पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेनेने भाजपवर दबाब टाकून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. शिवसेनेचे इच्छूक उमेदवार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता भाजपचे विद्ममान खासदार गावित यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राजेंद्र गावित यांना भाजपातून होत असलेला विरोध शमविण्यात ते कशा प्रकारे यशस्वी होतात, हे पाहावे लागेल. गावित यांना होत असलेला विरोध पाहता त्यांनाही निवडणूक अडचणीची जाणार हेही तितकेच खरे.

Intro: पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीततील व्हिडीओ सर्वत्र वायरलBody: पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीततील व्हिडीओ सर्वत्र वायरल

नमित पाटील,
पालघर,दि.1/4/2019,

पालघरमध्ये भाजपाचा उमेदवार निवडुन येऊ शकेल, असे वातावारण असून कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. पालघरची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपामध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीततील एक व्हिडीओ सर्वत्र वायरल झाला आहे.

पालघरच्या जागेसाठी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत युतीच्या सभा, मेळाव्याला न जाण्याचा निर्णय गुरुवारी, डहाणू- सरावली येथे भाजपच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याने बंड समोर आले आहे. समाज माध्यमांमध्ये वायरल झालेल्या या व्हिडीओत पालघर जिल्हयातील पदाधिकारी कार्यकर्ते महीला पदाधिकारी यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत नगराध्यक्ष भरत राजपूत, आदिवासी आघाडी प्रमुख हरिश्चंद्र भोये, लुईस काकड, नंदकुमार पाटील, विना देशमुख महीला आघाडी प्रमुख, सरपंच सुरेश शिंदा, जगदिश राजपूत, विवेक कोर आदी या सभेत उपस्थित होते.

पालघर जिल्हयात भाजपाचा एक खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषदेचे २१ सदस्य पंचायत समिती, जिल्हारिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, अनेक ग्रामंचायती, ३ नगराध्यक्ष, नगरसेवक अशी प्रचंड ताकद आहे. त्यामुळे पालघरच्या जागेसाठी भाजपााच्या नेत्यांनी फेरविचार करावा असे म्हणत भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी डहाणू येथील बैठकीत आक्रमक झाले आहेेेत.

पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे पालघर जिल्हय़ातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडू नये यासाठी वरीष्ठांकडे साकडे घातले होते. मात्र वरिष्ठांनी दुर्लक्ष करुन शिवसेनेला ही जागा सोडल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. भाजप शिवसेना युती झाल्यामुळे हा मतदारस संघ शिवसेनेने भाजपावर दबाब टाकून हिसकावून घेतला. शिवसेनेचे इच्छूक उमेदवार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता भाजपाचे विद्ममान खासदार गावित यांना शिवसेनेत प्रवेश देऊन पालघर मतदारसंघात उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्यव्यक्त होत आहे. राजेंद्र गावित यांना भाजपतून होत असलेला विरोध शमविण्यात ते कशा प्रकारे यशस्वी होतात, हे पाहावे लागेल. गावित यांना होत असलेला विरोध पाहता त्यांनाही निवडणूक अडचणीची जाणार हेही तितकेच खरे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.