बोईसर (पालघर) - चिल्हार मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे.
कसा घडला अपघात?
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. बोईसर-चिल्हार मार्गावर वेळगाव येथे हा अपघात घडला. यावेळी दुचाकीस्वाराला धडक दिलेला अज्ञात वाहनचालक फरार झाला. साईनाथ लक्ष्मण भुयाळ असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी चिल्हार येथील रहिवासी आहे. जखमी साईनाथ यांना अधिकारी लाईफलाइन या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - देशाला चुकीच्या दिशेने नेऊन भाजपाने आर्थिक स्थिती बिघडवली - जयंत पाटील
रस्त्याचे काम अर्धवट
बोईसर-चिल्हार मार्गावर रस्त्याचे काम अर्धवट सोडले आहे. त्याठिकाणी सूचना फलक नसल्याने या मार्गावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा मार्ग दुचाकीस्वारांसाठी धोकादायक बनला आहे.
हेही वाचा - 'नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं'