ST bus Accident : दोन एसटी बसचा अपघात; 22 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर - ST bus Accident
जव्हार – सेलवास मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक व जळगाव आगाराच्या दोन बसचा सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात ( Two Bus Accident ) झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात नाशिकच्या चालक व वाहकासह 20 प्रवासी जखमी झाले ( 20 Passengers Including Driver Carrier Critical ) आहेत.
पालघर : जव्हार – सेलवास मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक व जळगाव आगाराच्या दोन बसचा सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात ( Two Bus Accident ) झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात नाशिकच्या चालक व वाहकासह 20 प्रवासी जखमी झाले ( 20 Passengers Including Driver Carrier Critical ) आहेत. त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
चालक - वाहकाची प्रकृती गंभीर : जव्हारहून सेलवासकडे जाणारी नाशिक आगाराची एसटी बस आणि सेलवासकडून जव्हारच्या दिशेने येणारी जळगाव आगाराची बस वळणावर एकमेकांना धडकल्या. जव्हारपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर घाट रस्ता असलेल्या प्रकाश पोल्ट्री, भरसटमेट गावाजवळ हा अपघात झाला. त्यात 22 जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर ( Two Passengers Condition Critical ) आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले.
नागपूरमध्ये अपघात : महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर सावनेर तालुक्यातील मांगसा येथे एसटी बस व कारचा अपघात झाला ( ST bus car accident )आहे. आज सकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले ( one died seven injured ) आहेत. केलवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.