पालघर - भाईंदर पूर्व परिसरात गोल्डन नेस्ट चौकात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना नवघर पोलिसांनी गजाआड केले. अंकेश थोरात आणि रविंद्र पटेल अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून तब्बल तीस लाख रुपये किंमतीची कातडी जप्त करण्यात आली आहे.
गोल्डन नेस्ट चौकात बिबट्याची कातडी विकण्यासाठी अंकेश थोरात आणि रविंद्र पटेल हे गुजरातमधील सिल्वासावरून येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली. त्यानुसार नवघर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली. तपासणीअंती त्यांच्याकडे बिबट्याची कातडी सापडली.
हेही वाचा - विवाहित महिलेची राजस्थानात 2 लाखात विक्री; 6 आरोपींना अटक
दोघा आरोपींना पोलिसांनी नवघर ठाण्यात आणून कातडी तपासणी करण्याकरता वन विभागाकडे पाठवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.