पालघर - डहाणू तालुक्याततील गडचिंचले येथे जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात गुरुवारी रात्री दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या केली होती. हा मुद्दा देशभर गाजला. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी हे प्रकरण हाताळत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे समजते.