पालघर - मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरचोळे गावात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना 21 ऑक्टोबरला घडली होती. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून गेले दोन महिने फरार असलेल्या संजय मधुकर तांबडी हा फरार होता. अखेर नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी (24 डिसें.) रात्री बांगरचोळे गावच्या जंगलातून अटक केली आहे.
दोन महिन्यांपासून होता आरोपी फरार
विक्रमगड तालुक्यातील बांगरचोळे गावच्या जंगलात गुरे चारण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी जंगलात गेली होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन 25 ऑक्टोबरला मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी संजय हा गायब होता.
जंगलातून केली आरोपीला अटक
आरोपी जंगलात तात्पुरत्या स्वरूपात झोपडी बनवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (24 डिसें.) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मनोर पोलिसांनी बांगरचोळे गावच्या जंगलात आरोपी लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जंगलात पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - हवालदार सखाराम भोये यांची आत्महत्या अत्यंत गंभीर बाब - विवेक पंडित
हेही वाचा - पालघर जिल्ह्यातील सागरी भूगर्भ सर्वेक्षणास मच्छीमारांचा विरोध; ओएनजीकडून फक्त आश्वासने