ETV Bharat / state

सोनसाखळी चोरणारे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त - नालासोपारा लेटेस्ट क्राईम न्यूज

गेल्या काही दिवसांपासून नालासोपारा पूर्व परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केले आहे.

Criminals
आरोपी
author img

By

Published : Dec 21, 2020, 9:20 AM IST

पालघर - नालासोपारा पूर्वेकडील परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना तुळींज पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून आतापर्यंत सहा गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोनसाखळी चोरणारे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त -

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील चार महिन्यांपासून सकाळी मॉर्निंग वॉकला, कामावर जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील आरोपी मनवर मेहबूब शेख (वय 19) आणि अमजद बफाशीर खान (वय 21) यांना 15 डिसेंबरला अटक केले होते. या आरोपींकडून सहा गुन्ह्यांची उकल करत 2 लाख 24 हजारांचे सोन्याचे दागिने, मोबाईल, 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपींना पोलीस कोठडी -

सोनसाखळी चोरी करणारे दोन सराईत चोर पकडले आहेत. सहा गुन्ह्यांची उकल करत चोरीचा लाखोंचा माल जप्त केला आहे. यांच्या आणखी साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.