ETV Bharat / state

पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 89.85 टक्के; मुलीच ठरल्या वरचढ - बारावी निकाल बारामती बातमी

पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल 89.85 टक्के इतका लागला असून 44 हजार 230 विद्यार्थ्यांपैकी 39 हजार 739 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत बसलेल्या 24 हजार 450 मुलांपैकी 21 हजार 543 मुले उत्तीर्ण म्हणजेच 88.11 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तसेच 19 हजार 780 मुलीपैकी 18 हजार 196 उत्तीर्ण म्हणजेच 91.99 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून बारावीच्या जिल्ह्यातील या निकालात मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.

पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 89.85 टक्के

author img

By

Published : Jul 16, 2020, 5:51 PM IST

पालघर - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर झाला आहे. पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल 89.85 टक्के इतका लागला असून 44 हजार 230 विद्यार्थ्यांपैकी 39 हजार 739 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत बसलेल्या 24 हजार 450 मुलांपैकी 21 हजार 543 मुले उत्तीर्ण म्हणजेच 88.11 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तसेच 19 हजार 780 मुलीपैकी 18 हजार 196 उत्तीर्ण म्हणजेच 91.99 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून बारावीच्या जिल्ह्यातील या निकालात मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील 44 हजार 483 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी 44 हजार 230 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले. त्यातून 39 हजार 739 म्हणजेच 89.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा शाखेतून परीक्षा ऊत्तीर्ण झालेल्या एकूण 39 हजार 739 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 387 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर, 11 हजार 713 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 21 हजार 928 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्ह्याच्या निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 95.98 टक्के निकाल लागला आहे. तर 91.95 टक्के निकाल वाणिज्य शाखेचा, व्होकेशनलचा 90.32 टक्के तर सर्वात कमी म्हणजेच 79.92 टक्के निकाल हा कला शाखेचा लागला आहे. पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यात सर्वाधिक 93.38 टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल वसई तालुक्यातील 92.1 टक्के, मोखाडा 89.13 टक्के, डहाणू 87.38 टक्के, पालघर 86.74 टक्के, वाडा 86.14 टक्के, विक्रमगड 84.05 टक्के, जव्हार 74.69 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.