ETV Bharat / state

विरारमध्ये 'जय भीम'ची पुनरावृत्ती; पोटाची खळगी भरणाऱ्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांची मारहाण - Lalbavata Sanghatana

पोलिसांनी चार आदिवासी महिलांना चोरीच्या(tribal women arrest) केवळ संशयावरून ताब्यात घेतले. त्यांना मारहाण केली. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. इतकेच नव्हे तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली नाही, अशी माहिती आदिवासी संघटनेच्या (tribal organization in Palghar on tribal women beaten) कार्यकर्त्यांनी दिली.

http://10.10.50.85//maharashtra/23-November-2021/mh-pal-01-tribal-women-beaten-by-police-for-being-thieves-byet-vis-mh10065_23112021104048_2311f_1637644248_76.jpg

author img

By

Published : Nov 23, 2021, 3:15 PM IST

Updated : Nov 23, 2021, 3:39 PM IST

विरार (पालघर) - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटाच्या कथेची (Incident like Jay bhim in Virar) पुनरावृत्ती वाटावी, अशी घटना वसईत उघडकीस आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम (tribal women beaten by police) मारहाण केली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत.

पोलिसांनी चार आदिवासी महिलांना चोरीच्या केवळ संशयावरून ताब्यात घेतले. त्यांना मारहाण केली. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. इतकेच नव्हे तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली नाही, अशी माहिती आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

विरारमध्ये 'जय भीम'ची पुनरावृत्ती

हेही वाचा-terrible accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळली, लहान मूलासह 5 जणांचा जागीच मृत्यू

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारूसुभाष डोकफोडे या सहा आदिवासी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या महिला वसईच्या पापडी तलाव, कोळीवाडा या ठिकाणी राहतात. महिला मोलमजुरीचे काम करतात.

हेही वाचा-पेट्रोल महाग, दारू स्वस्त ही संस्कृती कधी नव्हती - रवी राणा

सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याकडून आदिवासी महिलांना लाठीने मारहाण

महिला शुक्रवारी पापडी येथे बाजारात गेल्या होत्या. बाजारहाट करताना काही नागरिकांनी त्या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या महिलांना पापडी येथील पोलीस चौकीत नेले. तेथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ (API Wagh in Virar) आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना लाठीने मारहाण करून पुन्हा बाजारात दिसू नका, अशी धमकी दिली.

हेही वाचा-संघाचे निष्ठावंत राहिलेले छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी, नागपुरात भाजपला मोठे आव्हान

महिलांच्या दंडावर मारहाणीच्या खुणा

मारहाण झाल्यानंतर आदिवासी महिलांनी आदिवासी संघटनांना माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला. केवळ समज देण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला. तर वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणीत महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांच्या दंडावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

आदिवासी काढणार गुरुवारी मोर्चा-

संबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटना (Shramjeevi Sanghatana) आणि लालबावटा संघटनेने (Lalbavata Sanghatana) केली आहे. या प्रकरणी २५ नोव्हेंबरला वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी कार्यकर्ते कॉम्रेड शेरू वाघ (comrade Sheru Wagh) यांनी दिला.

Last Updated : Nov 23, 2021, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.