पालघर/वसई - तुंगारेश्वर येथील धबधब्यावर जाण्यासाठी मुंबई मालवणी येथून आलेल्या तीन जणांना वालीव पोलिसाने मज्जाव केल्याने त्याला धक्काबूक्की करत मारहाण केल्याची घटना बुधवारी वसईत घडली आहे. यात दोन पूरूष व एका महिलेचा समावेश आहे.
सद्या पालघर जिल्हातील पर्यटनस्थळावर पावसाळी पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील मोठ्या संख्येने पर्यटक तरूण तरूणी समूद्रकिनारी व धबधब्याच्या ठिकाणी येत असतात. वसई पूर्व तुंगारेश्वर येथे चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बुधवारी मूंबई मालवणी येथील आकाश दिलपे, इमरान शेख व सुचीता दिलपे हे तीघे वसईत आले होते. यावेळी तुंगारेश्वर धबधब्याकडे जाणारा मार्ग वालीव पोलिसांनी बाप्पा सिताराम मंदिर येथे बॅरीगेट लावून बंद केला होता. या तिघांना तेथील पोलीस हवालदार विनोद फूलसींग याने धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला असता त्याला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. तसेच दगड मारून दुखापत करण्याचा प्रयत्न केला. कामावर असताना सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद फूलसींग यांनी वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक सांगवीकर यासंदर्भात तपास करित आहेत.