ETV Bharat / state

पालघरमध्ये मुसळधार.. जोरदार वाऱ्यामुळे झाड कोसळून तीन घरे जमीनदोस्त - पालघरमध्ये वादळ

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह वाऱ्यामुळे पालघर नजीक गोठणपूर येथे एक घर पूर्णपणे जमीनदोस्त तर दोन घरांवर झाड कोसळून या दोन घरांचेही नुकसान झाले आहे. यात काेणतीही जिवीतहानी झाली नसून रूपाली सखाराम रिंजड नामक वृध्द महिला यात किरकोळ जखमी झाली आहे.

तीन घरे जमीनदोस्त
author img

By

Published : Sep 8, 2019, 4:44 PM IST

पालघर- जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाबरोबरच मध्यरात्रीपासून वारेही वाहत होते. सतत पडत असलेल्या पऊस व वाऱ्यामुळे पालघर नजीक गोठणपूर येथे पहाटे 5.30च्या सुमारास एक घर पुर्णपणे खाली कोसळले. तसेच दोन घरांवर झाड कोसळले आहे. या घटनेत तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले असून एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे.

प्रतिक्रिया देताना नुकसानग्रस्त घरमालक

गोठणपूर येथील रहिवासी सुभाष सखाराम रिंजड हे आपल्या परिवारासह गौरीसाठी आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे त्यांचे संपूर्ण घर खाली कोसळले. घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. रुपाली सखाराम रिंजड, रामदास गणपत रिंजड यांच्या घरावर झाड कोसळले आहे. रुपाली या वृद्ध महिला घरात झोपल्या असताना त्यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांच्या खांद्यावर पत्रा पडला व त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. रुपाली व रामदास रिंजड यांच्या घरांवर झाड कोसळल्याने त्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी असे नुकसानग्रस्त कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा- पालघरमध्ये मस्करीत गळा दाबल्याने तरुणाचा मृत्यू

Intro:गोठणपूर येथे वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक घर जमीनदोस्त तर दोन घरांवर पडले झाड; कोणतीही जीवितहानी नाही, एक महिला किरकोळ जखमी, घरांचे मोठे नुकसानBody:गोठणपूर येथे वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक घर जमीनदोस्त तर दोन घरांवर पडले झाड; कोणतीही जीवितहानी नाही, एक महिला किरकोळ जखमी, घरांचे मोठे नुकसान

नमित पाटील,
पालघर, दि. 9/8/2019

     पालघरमध्ये कालपासून मुसळधार सुरू होता, त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाची संततधारेसह जोराने वारे वाहत होते. सतत पडत असलेल्या पऊस व वाऱ्यामुळे पालघर नजीक गोठणपूर येथे पहाटे 5.30 च्या सुमारास एक घर पूर्णपणे खाली कोसळले असून दोन घरांवर झाड कोसळले आहे. या घटनेत तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले असून एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे.

  गोठणपूर येथील रहिवासी  सुभाष सखाराम रिंजड हे आपल्या परिवारासह गौरीसाठी आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे त्यांचे संपूर्ण घर खाली कोसळले. घरातले सर्व सदस्य बाहेर असल्यामुळे  सुदैवाने  या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

     रुपाली सखाराम रिंजड, रामदास गणपत रिंजड यांच्या घरावर झाड कोसळले आहे. रुपाली सखाराम रिंजड या वृद्ध महिला घरात झोपल्या असताना त्यांच्या घरावर झाड कोसळल्यामुळे, त्यांच्या खांद्यावर पत्रा पडला व त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. रुपाली सखाराम रिंजड व रामदास गणपत रिंजड यांच्या घरावर झाड कोसळल्यामुळे त्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे.

      अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटवण्याचे व मदत कार्य सुरू आहे. प्रशासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असे  तिन्ही नुकसानग्रस्त  कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Byte:-
1. सुभाष सखाराम रिंजड-  घर जमीनदोस्त झालेल्या घराचे मालक
2.रामदास रिंजड- झाड कोसळल्या घराचे मालक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.