ETV Bharat / state

जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा रकाना नाही; ओबीसींच्या घरांवर बहिष्काराची भित्तीपत्रके - जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा रकाना नाही

पालघर जिल्ह्यातील सोनाळे बुद्रुक गावातील ओबीसी प्रवर्गातील लोकांनी आपल्या घराच्या दर्शनी भागावर कागदी फलक लावले आहेत. लवकरच 2021 च्या जनगणनेला प्रारंभ होणार तशा हालचाली शासकीय पातळीवर सुरू आहेत.

palghar
जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा रकाना नाही; ओबीसींच्या घरांवर भित्तीपत्रके
author img

By

Published : Mar 13, 2020, 12:47 PM IST

पालघर - 2021 च्या लोकसंख्या जनगणनेत इतर जाती प्रवर्गासाठी रकाने आहेत. मात्र, ओबीसींसाठी रकाना नाही म्हणून या जनगणनेला आम्ही सहकार्य करणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची माहीती देणार नाही. या जनगणनेच्या प्रकियेला आमचा विरोध असून जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा जिल्ह्य़ातील ओबीसी प्रवर्गातील जनतेने घेतला आहे.

जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा रकाना नाही; ओबीसींच्या घरांवर भित्तीपत्रके

हेही वाचा - धुलीवंदनानिमित्त आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा बोहाडा उत्सव

पालघर जिल्ह्यातील सोनाळे बुद्रुक गावातील ओबीसी प्रवर्गातील लोकांनी आपल्या घराच्या दर्शनी भागावर कागदी फलक लावले आहेत. लवकरच 2021 च्या जनगणनेला प्रारंभ होणार तशा हालचाली शासकीय पातळीवर सुरू आहेत. जनगणनेत ओबीसी प्रवर्गाला स्वतंत्र रकाना देण्यात यावा. ओबीसींचीही जनगणना व्हावी या उद्देशाने ही चळवळ गावा गावात उभी राहत आहे. पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील सोनाळे गावातील लोकांनी या जनगणनेला विरोध करून बहीष्कार टाकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.