पालघर - नऊ महिन्यांपासून बेकारी, त्यानंतर रोजगार बुडाल्यामुळे हजारो कुटुंब उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहेत. रिक्षाचालकांची परिस्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे. चार ऐवजी दोनच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत बुडालेले उत्पन्न यामुळे रिक्षा चलाकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत महिलेने विसरलेली दागिन्याची पर्स हाती लागली. पण, नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकाने ती बॅक परत करत आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 16 डिसें.) रात्री घडला आहे.
प्रवासी आसनाच्या मागील मोकळ्या जागेत सापडली पर्स
याबाबत सविस्तर वृत्त असे, प्रदीप मोहिते (रा. डांगे कॉम्प्लेक्स, समेळगाव) हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी वाहतूक करत होते. बुधवारी (दि. 16 डिसें.) सायंकाळी मोहिते यांनी त्या महिलेला (मुळ रा. गुजरात) नालासोपारा स्टेशनला सोडले. तेथून ते आपल्या रिक्षा थांब्यावर परले. त्यानंतर प्रवासी आसनाच्या मागील मोकळ्या जागेत एक लेडीज पर्स सापडली. या पर्समध्ये बांगड्या, अंगठ्या, कार्णफुले, असे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, अशी महत्वाची कागदपत्रे होती.
शिवसैनिकांच्या मदतीने घेतला त्या महिलेच्या नातेवाईकांचा शोध
त्यानंतर मोहिते यांनी ती तत्काळ शिवसेनेचे कार्यकारिणी सदस्य अश्विनी मालाडकर यांच्याद्वारे शाखेत पोहोचवली. त्यानंतर शाखाप्रमुख प्रणब खामकर यांनी सदर प्रवासी महिलेच्या नातलगांचा शोध घेतला. त्यानंतर ती पर्स त्यांच्या स्वाधीन केली. यानंतर रिक्षाचालक प्रदीप मोहिते यांचा सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; पालघरमध्ये धरणे आंदोलन
हेही वाचा - वाढवण प्रकल्प सामजस्यांने पुढे नेण्यासाठी ठाकरेंनी मोदींना भेटावे - चंद्रकांत पाटील