ETV Bharat / state

Aswali Ashram Shala : अस्वाली आश्रमशाळेतील स्वच्छतागृह व स्नानगृहाच्या इमारत बांधकामाचा दर्जा निकृष्ट

डहाणू तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय माध्यमिक अस्वाली आश्रम शाळेत शौचालय व स्नानगृहाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ठेकेदाराची मनमानी व अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. इमारतीचे काम गिरिट पावडरने करण्यात येत आहे. बांधकाम सुरू असतानाच काँक्रीट कॉलमला तडे गेले आहेत. त्यामुळे हे बांधकाम किती टिकणार, त्याचा दर्जा काय ? याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (quality of construction of the toilet and bathroom is poor)

Aswali Ashram Shala
अस्वाली आश्रमशाळेतील स्वच्छतागृह व स्नानगृहाच्या इमारत बांधकामाचा दर्जा निकृष्ट
author img

By

Published : Dec 8, 2022, 3:20 PM IST

पालघर/डहाणू : विशेष केंद्रीय सहायता निधी २७५/१ या योजनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अस्वाली येथील शासकीय आश्रमशाळेत २०१७ - १८ या वर्षात मंजूर झालेल्या शौचालय व स्नानगृहाच्या इमारतीचे पायोनियर कन्ट्रक्शन या ठेकेदार कंपनी कडून बांधकाम सुरू आहे. नियमानुसार बांधकामासाठी रेती किंवा क्रश सँड वापरण्याची परवानगी असताना ठेकेदाराने या बांधकामासाठी गिरीट पावडरचा वापर केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पायालगतच्या काँक्रीट कॉलमला तडा गेल्या आहेत. काँक्रीट बांधकाम पक्के होण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मात्र, याठिकाणी त्यावर पाणीच शिंपडले जात नाही. त्यामुळे आजपर्यंत झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. ते किती टिकणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (quality of construction of the toilet and bathroom is poor)

बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले : शासकीय इमारतीचे बांधकाम अभियंत्याच्या देखरेखीखाली होणे गरजेचे आहे. याविषयी डहाणू प्रकल्पाचे कनिष्ठ बांधकाम अभियंता गजानन जाधव यांना विचारले असता, मी याठिकाणी तीन वेळा भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे, असे सांगण्यात आले. कामाची पाहणी करूनही जर काम निकृष्ट दर्जाचे होत असेल, तर यास जबाबदार कोण ? ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताने हे बांधकाम होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराने शासनाच्या अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी दराने २०१७ - १८ यावर्षी काम घेतले होते. ते २०२२ च्या अखेरीस सुरू आहे. त्यामुळे आता बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरून काम कसेबसे पूर्ण करायचे अशी ठेकेदारची लगबग सुरू आहे.

भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते : काम सुरू असतानाच जर तडे जात असतील तर भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. इमारतीचा पायाच कच्चा असेल तर ते टिकणार कसे ? हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. असा आरोप करत झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम तोडून नवीन दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, तसेच यासाठी संबंधित ठेकेदार व अभियंत्यांना पाठीशी घालू नये, या बांधकामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरुण धोडी यांनी केली आहे.

प्रकल्प कार्यालय स्तरावरून सुरू आहे : सदर इमारतीचे काम प्रकल्प कार्यालय स्तरावरून सुरू आहे. शाळेकडे अंदाजपत्रकाची प्रत दिलेली नाही. त्यामुळे काम नेमके कोणत्या प्रकारचे आहे याची मला विशेष माहिती नाही. माझ्या उपस्थितीत तरी बांधकाम अभियंत्याने स्थळपाहणी केलेली नाही. तशी शेरा बुकात एकही नोंद नाही, अशी माहिती अस्वाली आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.