ETV Bharat / state

डहाणू समुद्रकिनारी ताडबिया रोपणाचे अभियान; उपक्रमामुळे चिखले समुद्र किनारी शेकडो रोपे जगविण्यात यश - tad

डहाणू तालुक्यातील चिखले समुद्र किनारी ताडबिया रोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे आजतागायत चिखले समुद्र किनारी शेकडो रोपे जगविण्यात यश आले आहे.

डहाणू समुद्रकिनारी ताडबिया रोपणाचे अभियान
author img

By

Published : Aug 13, 2019, 6:57 PM IST

पालघर - डहाणू तालुक्यातील चिखले समुद्र किनारी ताडबिया रोपणाचा उपक्रम मागील आठ वर्षांपासून राबविला जात आहे. यंदाही हा उपक्रम जोमाने पार पाडला. या उपक्रमामुळे आजतागायत चिखले समुद्र किनारी शेकडो रोपे जगविण्यात यश आले आहे.

डहाणू समुद्रकिनारी ताडबिया रोपणाचे अभियान

या उपक्रमात बोर्डी वन विभाग, वाईल्डलाईफ कंन्झर्व्हेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन, समुद्रकाष्ठ मित्र मंडळ, पक्षी आणि समुद्री कासव प्रेमी, स्थानिक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. या झाडांच्या रोपांची उपलब्धता, लागवड, खत व जल व्यस्थापन आणि कुंपणावर शून्य खर्च येतो. तसेच या झाडांच्या झावळ्यांचा उपयोग घरबांधणीसाठी देखील केला जातो. ताडी उद्योग आणि निऱ्यापासून गूळ निर्मितीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

राज्यातील सागरी किनाऱ्यांवर स्थानिकांकडून स्वयं स्फुर्तीने राबविला जाणारा हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे वृक्षांच्या संवर्धनामध्ये मदत होईल तसेच पाणथळ व अन्य पक्षांकरिता अधिवास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. यावेळी कासव व पक्षी निरीक्षक गटाने अभियानात भाग घेऊन पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन केले.

Intro:डहाणू समुद्रकिनारी पर्यावरणाला पोषक ताडबिया रोपण अभियानBody:डहाणू समुद्रकिनारी पर्यावरणाला पोषक ताडबिया रोपण अभियान

नमित पाटील,
पालघर, दि.13/8/2019

डहाणू तालुक्यातील चिखले समुद्रकिनारी ताडबिया रोपणाचा उपक्रम मागील आठ वर्षांपासून राबविला जात आहे. बोर्डी वन विभाग, वाईल्डलाईफ कंन्झर्व्हेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन, समुद्रकाष्ठ मित्र मंडळ, पक्षी आणि समुद्री कासव प्रेमी, स्थानिक पर्यावरण प्रेमी उपक्रमात सहभागी झाले होते. आजतागायत चिखले समुद्रकिनारी शेकडो रोपे जगविण्यात यश आले आहे.

या झाडांच्या रोपांची उपलब्धता, लागवड, खत व जलव्यस्थापन आणि कुंपणावर शून्य खर्च येतो. तसेच या झाडांच्या झावळ्यांचा उपयोग घरबांधणीसाठी केला जातो, ताडी उद्योग आणि निऱ्यापासून गूळ निर्मितीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. राज्यातील सागरी किनाऱ्यावर स्थानिकांकडून स्वयं स्फूर्तीने राबविला जाणारा हा अभिनव उपक्रम म्हणून आहे.

या वृक्षांच्या संवर्धनामुळे पाणथळ व अन्य पक्षांकरिता अधिवास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. यावेळी कासव व पक्षी निरीक्षक गटाने अभियानात भाग घेऊन मार्गदर्शन केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.