पालघर - पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ( Suspicious death of a minor girl ) झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर मिळून आला आहे. मंगळवार पासून ती बेपत्ता होती, (She missing Tuesday.) ती सापडत नाही म्हणून कुटुंबियांनी बुधवारी मिसिंगची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात ( Report to Jawahar Police Station ) दाखल केली होती. बुधवारी सायंकाळी मात्र, गावकऱ्यांना तिचा मृतदेह ( Her body was found ) सापडून आला, अंगावर व डोक्यावर मार लागल्याचे प्रथम दर्शनीय दिसून आले. नागरिकांनी तिचा बलात्कार ( Rape ) झाल्याच्या संशय व्यक्त केला.
या धक्कादायक घटनेनंतर पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, प्रकाश गायकवाड घटनास्थळी उपस्थित होते, दरम्यान जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे अधिक तपास करीत असून, अज्ञात इसमा विरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा ( Crime against anonymity ) दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचे सर्वसमावेशक उमेदवारीची प्रयत्न हे दिवा स्वप्नच