ETV Bharat / state

मंजुरी मिळूनही वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी परवड

गारगाव शासकीय आश्रमशाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आश्रम शाळेत इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र हे वर्ग या शाळेत न भरता गुहिर आश्रमशाळेत भरत असल्याने, गारगाव परिसरातील मुलांची गैरसोय होत आहे. हे वर्ग गारगाव आश्रमशाळेत भरवण्यात यावेत अशी मागणी पालकांनी केली आहे.

मंजुरी मिळूनही वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी परवड
मंजुरी मिळूनही वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी परवड
author img

By

Published : Feb 7, 2021, 3:00 PM IST

पालघर - गारगाव शासकीय आश्रमशाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आश्रम शाळेत इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र हे वर्ग या शाळेत न भरता गुहिर आश्रमशाळेत भरत असल्याने, गारगाव परिसरातील मुलांची गैरसोय होत आहे. हे वर्ग गारगाव आश्रमशाळेत भरवण्यात यावेत अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान हे वर्ग गुहिर आश्रमशाळेत सुरू आहेत, मात्र त्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांचा पगार हा गारगावच्या शाळेतूनच होत असल्याचे समोर आले आहे.

मंजुरी मिळूनही वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी परवड

गारगाव शासकीय आश्रमशाळेत विज्ञान शाखेचे 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र हे वर्ग गारगावमध्ये न भरता गुहिर आश्रमशाळेत भरत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांची गैरसोय होत आहे, त्यांना उच्चशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, त्यामुळे हे वर्ग तातडीने गारगाव आश्रम शाळेतच भरवण्यात यावेत अशी मागणी पालकांनी केली आहे.

वर्ग भरतात गुहिरमध्ये शिक्षकांचे वेतन मात्र गारगाव शाळेतून

जिल्ह्यातील ओगदा, उज्जेनी, आखाडा आणि गारगाव परिसरातील आदिवासी मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी गारगाव येथील आश्रम शाळेत 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या शाळेत एक हजारांच्या आसपास विद्यार्थी आहेत. मात्र मंजुरी देण्यात आलेले वर्ग गारगावमध्ये भरत नसून, ते गुहिरमध्ये भरत असल्याचे, मात्र तरीदेखील या वर्गांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे वेतन हे गारगाव शाळेमधूनच निघत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकरे आणि ग्रामस्थांनी समोर आणला आहे.

मंजूर करण्यात आलेले वर्ग गारगावमध्ये सुरू करण्याची मागणी

दरम्यान गारगाव ते गुहिर हे अंतर 50 किलोमिटरचे आहे, विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर घरापासून दूर गुहिरमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे गारगावला मंजूर झालेले वर्ग गारगावमध्येच सुरू करावेत आणि आमच्या मुलांची शिक्षणासाठी होणारी परवड थांबवावी अशी मागणी या ग्रामस्थांकडून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.