पालघर - देवगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने जात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातून या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध केला जात आहे. पालघर-वाडा-देवगाव हा राज्यमार्ग वाडा नगरपंचायतीच्या हद्दीतून जातो. वाडा शहरातील खंडेश्र्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटवून 15 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन
रस्ता रुंदीकरणाच्या कामाला व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या रूंदीकरणामुळे व्यापाऱ्यांवर बेरोजागारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री विष्णू सवरा आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रूंदकरण रद्द करण्याची मागणी केली होती. तर आता या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
हेही वाचा - विरारमध्ये रस्त्यावर अंड्याचा टेम्पो झाला पलटी
तर रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटत असली तरी, यामध्ये येथील व्यापाऱ्यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पुनर्वसनाच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.