पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सध्या रस्ते आणि शहरांमध्ये शुकशुकाट असून अनेक वन्यप्राणी, साप शहरांमध्ये आणि रस्त्यांवर मुक्तपणे वावरताना पाहायला मिळतात. पालघरमधील माहीम रोडवरील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये असाच धामण जातीचा साप दिसून आल्याने येथील रहिवाशांची तारांबळ उडाली.
त्यानंतर येथील रहिवाशांनी मात्र सर्प मित्राला पाचारण केले. सर्पमित्र वैशाली चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हा साप पकडला व अपार्टमेंटमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्पमित्रामार्फत या सापाला सुरक्षितस्थळी सोडण्यात आले आहे.