ETV Bharat / state

पालघर येथे टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारुची तस्करी; 13 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त

जव्हार- नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पोमधून सिल्वासा येथून अवैद्य दारु नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास संशयित टेम्पोची झडती घेतली.

13 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:24 PM IST

पालघर - येथील जव्हार-नाशिक मार्गावर टोमॅटोच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱया टेम्पोमधून अवैद्य दारुची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत 13 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कारवाई नंतर बोलताना मोहोम्मद शेख- उपअधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर
जव्हार- नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पोमधून सिल्वासा येथून अवैद्य दारु नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास संशयित टेम्पोची झडती घेतली. या टेम्पोमधून टोमॅटोच्या रॅकमागे 120 बॉक्स अवैध दारु आढळून आली. उत्पादन शुल्क विभागाने 7 लाख रुपये किमतीचे 120 बाॅक्स अवैध विदेशी दारु, 6 लाख रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी प्रदिप संग्राम कुमावत व विक्रम रघुराम सिंग यांना अटक करण्यात आली, असून हे दोघेही मूळचे राजस्थान येथील आहेत.

अवैध दारु तस्करी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाजीपाला वाहतुकीच्या नावाने वाहन करार करुन भाडेतत्वावर घेण्यात येतात. मात्र, या भाजीपाला वाहतुकीच्या आड शेतकऱ्यांच्याही नकळत अवैद्य दारुची तस्करी केली जाते. या वाहनांमध्ये जीपीएस व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तस्करीसाठी वापरण्यात येणारी गाडी कुठे व कोणत्या मार्गावर आहे, याबाबतची सर्व माहिती तस्करीच्या मुख्य सूत्रधाराला वेळोवेळी मिळत राहते.

Intro:टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारूच्या तस्करीचा प्रकार उघड; राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक पालघरची कारवाई 13 लाख किमतीचा  मुद्देमाल जप्तBody:टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारूच्या तस्करीचा प्रकार उघड; राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक पालघरची कारवाई 13 लाख किमतीचा  मुद्देमाल जप्त

नमित पाटील,
पालघर, दि.28/8/2019

       जव्हार- नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पोमधून सिल्वासा येथील अवैध मद्यासाठा विक्रीसाठी नाशिक येथे नेला जात असताना राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत अवैध विदेशी मद्यासह एकूण 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

     जव्हार- नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैध सिल्वासा  येथून नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर भरारी पथकाचेेे निरीक्षक सुभाष जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री  सुमारास संशयित टेम्पोची झडती घेतली असता, या टेम्पोमधून टोमॅटोच्या रॅकमागे 120 बॉक्स अवैध मद्य आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाने 7 लाख रुपये किमतीचे 120 बाॅक्स अवैध विदेशी मद्य व 6 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकरणी दोन प्रदीप संग्राम कुमावत व विक्रम रघुराम सिंग अटक करण्यात आली असून हे दोघेही मूळचे राजस्थान येथील आहेत. 

        अवैध मद्य तस्करी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाजीपाला वाहतुकीच्या नावाने वाहन करार करून भाडेतत्वावर घेण्यात येतात. मात्र  या भाजीपाला वाहतुकीच्या आड शेतकऱ्यांच्याही नकळत अवैद्य दारूची तस्करी केली जाते. या वाहनांमध्ये  जीपीएस व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे  तस्करीसाठी वापरण्यात येणारी गाडी कुठे व कोणत्या मार्गावर आहे, याबाबतची सर्व माहिती तस्करीच्या मुख्य सूत्रधारला वेळोवेळी मिळत राहते. तसेच गाडी कुठेही बसून वाहन चालू अथवा बंद करता येते.

Byte 
मोहोम्मद शेख- उपअधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.