ETV Bharat / state

डहाणू पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण - dahanu police station

डहाणू पोलीस ठाण्यातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

dahanu police station
डहाणू पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 3, 2020, 6:48 AM IST

पालघर - डहाणू पोलीस ठाण्यातील 6 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका महिला कर्मचार्‍याचा देखील समावेश आहे. तसेच डहाणू येथील काहागृहात अटकेत असलेल्या एका आरोपीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या डहाणू पोलीस ठाण्यातील 6 पोलिसांपैकी 4 जण डहाणू तालुक्यातील तर 2 पालघर तालुक्यातील आहेत. डहाणू येथील 4 कोरोना पॉझिटिव्ह पोलीस पटेलपाडा, मांगेल आळी, मसोली, धुंदलवाडी येथील रहिवासी आहेत. पालघर तालुक्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून महिला पोलीस कर्मचारी पालघर शहरातील लोकमान्य नगर तर दुसरा पोलीस कर्मचारी पालघर-पूर्व, आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे. डहाणू येथे एका प्रकरणातील आरोपी 32 वर्षीय पुरुष व 34 महिला अशा दोघांची अटकपूर्व कोरोना चाचणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी (दि.1 जून) समोर आले होते. या दोन रुग्णांच्या संपर्कात आल्याने डहाणू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या 6 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

डहाणू येथे कारागृहात अटकेत असलेल्या कल्याण येथील 29 वर्षीय रहिवासी आरोपिची अटकपूर्व कोरोना चाचणी केली असता तोही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापर्यंत एकूण 118 कोरोना बाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 53 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - निसर्ग वादळ: वसई तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन सतर्क; एसडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ; 21 हजार नागरिकांना वादळाचा 'तडाखा' बसण्याची शक्यता, जिल्हाधिकारी म्हणाले. . . . .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.