ETV Bharat / state

श्रमजीवी संघटनेचे पालघरमध्ये आंदोलन; खावटी योजनेचा लाभ देण्याची मागणी - Palghar tehsil office protest

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे, हाताला काम नसल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ आली. ९ सप्टेंबरला आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढून खावटी अनुदान योजनेची घोषणा केली. मात्र, अजूनही या योजनेचा लाभ आदिवासींना मिळालेला नाही.

आंदोलनाचे दृष्य
आंदोलनाचे दृष्य
author img

By

Published : Sep 29, 2020, 4:26 PM IST

पालघर - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार गंभीर नसून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न अजूनही कागदावरच आहे. या गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने खावटी योजनेची घोषणा केली. मात्र, योजना अजूनही कागदावरच असून योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे, श्रमजीवी संघटनेतर्फे आज पालघर तहसील कार्यालयासमोर आदिवासी विभागाचे 'तेरावे' कार्य करत, मुंडन करून आंदोलन करण्यात आले.

माहिती देताना श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे, हाताला काम नसल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ आली. ९ सप्टेंबरला आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढून खावटी अनुदान योजनेची घोषणा केली. मात्र, अजूनही या योजनेचा लाभ आदिवासींना मिळालेला नाही. याद्या बनवणे, सर्व्हे करणे असे करत आदिवासी विकास विभाग या योजनेला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, आक्रमक झालेल्या श्रमजीवी संघटनेने आज पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाने खावटी योजना कधी लागू होईल, त्याची तारीख सांगावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा- रेती प्रकरणी पोलीस अधीक्षकांची 13 पोलिसांवर कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.