पालघर - तालुक्यातील प्रलंबित वनदावे मंजूर करावे तसेच वनविभागात काम करणाऱ्या मजुरांना तात्काळ मजुरी मिळावी व विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेमार्फत पालघर येथील सहायक वनरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच कार्यालयाला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, आदिवासी बांधव सहभागी झाले होते. तसेच आंदोलनात आदिवासी महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. सहायक वनरक्षक यांना मागण्यांचे निवेदन देत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
पालघर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात विविध ठिकाणी आदिवासी बांधवांचे वनदावे अद्यापपर्यंत मंजूर झाले नसून ते प्रलंबित आहेत. तसेच वनविभागात काम करणारे वनमजूर, कॅम्प उपक्रमांतर्गत काम करणारे वनमजूर यांना एक वर्षापासून त्यांची मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वनविभागाने प्रलंबित वनदावे मंजूर करावे व वनमजुरांना त्यांची मजुरी मिळावी.आदींसह विविध मागण्यांसाठी आज सहायक वनसंरक्षक कार्यालय पालघर येथे श्रमाजिवी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -
कोरोनाच्या प्रसारामुळे अटारी-वाघा सीमेवर बिटिंग रिट्रिट समारोह प्रेक्षकांविनाच होणार
'नो येस बँक', राहुल गांधींनी सरकारवर केला अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप..