ETV Bharat / state

वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमातील आजीबाई आहेत कामात व्यग्र; नववर्षाच्या स्वागताची तयारी - पालघर वसई वृद्धाश्रम

सध्या सर्व आज्जीबाई वेगळ्याच कामात सद्या व्यग्र आहेत. फावल्या वेळात आपल्याला भेटीकरता येणाऱ्यांसाठी चक्क ग्रीटिंग कार्ड्स, मास्क तसेच कापडी पिशव्या बनविण्यात त्या सद्या मग्न आहेत. आश्रमातून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून कमी खर्चात तयार केलेल्या या वस्तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना आजी देणार आहेत.

पालघर
पालघर
author img

By

Published : Dec 30, 2020, 10:29 PM IST

पालघर/वसई - वृद्धाश्रम हा शब्दच किती उदासवाणा वाटतो. पण खरंच वृद्धाश्रम इतके उदासवाणे असतात का? महिला दिन, एखाद्याचा वाढदिवस किंवा सणानिमित्ताने आपण वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना भेट देत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांनी भरभरून दिलेले आशीर्वाद आपल्याला वेगळेच सुख देऊन जातो. मात्र, या वृद्धाश्रमातील आजी-आजोबा एरवी काय करतात, याचा कधी विचार केलाय का?. वसईतील श्रद्धानंद महिला आनंदाश्रमात राहणाऱ्या आजीबाईंना सद्या अशा गोष्टींवर विचार करायलाही वेळ नाही. कारण या सर्व आज्जीबाई वेगळ्याच कामात सद्या व्यग्र आहेत. फावल्या वेळात आपल्याला भेटीकरता येणाऱ्यांसाठी चक्क ग्रीटिंग कार्ड्स, मास्क तसेच कापडी पिशव्या बनविण्यात त्या सद्या मग्न आहेत. आश्रमातून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून कमी खर्चात तयार केलेल्या या वस्तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना आजी देणार आहेत.

पालघर

कौटुंबिक किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आश्रमात रहिवास
वृद्धांना कुटुंबापासून दूर आश्रमात ठेवायची वेळ का येते? लेकरांना आई-वडिलांची कटकट नकोशी होऊ लागते म्हणून? की घरी काळजी घेणं खरंच शक्‍य नसतं म्हणून? आपण ओझं होऊ नये म्हणून वृद्ध स्वतःच वृद्धाश्रमात जाऊन राहतात का? वृद्धांसाठी हा निवारा आहे.
आश्रमाच्या सदस्यांकडून असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले
बाहेरच्या जगात त्यांना बोलायला जागा नसते. आपण येथे राहतो याची खंत असते त्यांच्या मनात. वृद्धाश्रमात त्यांना दिलासा मिळतो. कौटुंबिक किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आश्रमात रहिवास करणाऱ्या आजींना आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्याची कोणतीही आठवण येऊ नये. त्या करमणुकीत व्यग्र असाव्यात यासाठी आश्रमाच्या सदस्यांकडून असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. दिवसभर सुरू असलेल्या या मौज मज्जेमुळे त्यांच्या मनात कोणताही विचार किंवा आजारपण येत नसल्याचे इथल्या आजी सांगत आहेत. सद्या उमा सातपुते, शैला रहाळकार, र्पावतीसह अनेक आज्जीबाई रक्ताच्या नाही पण माणुसकीच्या नात्याने आश्रमात भेटायला येणाऱ्यांना शुभेच्छा कार्ड, मास्क व कापडी पिशवी देऊन स्वागत करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.