पालघर : वसई पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ७ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. यात ३ महिला आणि ४ पुरुष यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चौघांकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड आढळून आले आहेत.
कागदपत्रे केली जप्त..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईच्या पाचूबंदर या ठिकाणी बेकादेशीरपणे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीनुसार ८ अधिकारी आणि २१ कर्मचाऱ्यांचा ताफा घेवून पोलिसांनी गुरुवारी सकाळी कोम्बिंग ऑपरेश सुरु केले होते. यात पोलिसांनी २५ संशयित नागरिकांना ताब्यात घेतले होते. त्यांची कागदपत्रे तपासली असता, पोलिसांना ७ नागरिक हे बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील कागदपत्रे जप्त केली आहेत.
बनावट आधार आणि पॅनकार्ड..
यात आणखी एका आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली. तसेच, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी चौघांकडे आधार आणि पॅनकार्ड मिळाले आहेत. ही कागदपत्रे त्यांनी कशी मिळवली याचाही तपास पोलीस करत असल्याचे करपे यांनी सांगितले.
हेही वाचा : सचिन वाझेंना अँटिलियाजवळ नेत एनआयएने केले गुन्ह्याचे नाट्य रुपांतर