ETV Bharat / state

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन, अंत्यविधीस फडणवीससह भाजपा नेते राहणार हजर

author img

By

Published : Dec 10, 2020, 11:26 AM IST

Updated : Dec 10, 2020, 12:21 PM IST

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या अंत्यविधीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

senior bjp leader Vishnu Savara passes away Leaders to be present at the funeral
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन, अंत्यविधीस फडणवीससह भाजप नेते राहणार हजर

पालघर - राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे मुंबई येथील कोकिलाबेन या रुग्णालयात वयाच्या 70 वर्षी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर वाडा येथील सिध्देश्वर घाट येथे दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यविधीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन...

विष्णू सावरा यांचा परिचय...

विष्णू रामा सवरा यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गालतरे या गावतला. ते स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीला होते. त्यांनी ही नोकरी १९८० साली सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. १९८० च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. पण या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर ते १९८५ च्या निवडणुकीत उभे राहिले. यातही त्यांचा पराभव झाला. पण यानंतर १९९० च्या विधानसभा निवडणुकीत विष्णू सावरा यांनी विजय मिळवला. मग सलग सहा टर्म (१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४) विष्णू सावरा हे आमदार म्हणून निवडून आले.

१९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. या काळात त्यांना मंत्रिपद मिळाले. युती सरकारमध्ये विष्णू सावरा यांना आदिवासी विकास मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर २०१४ साली पुन्हा शिवसेना-भाजपाची सत्ता राज्यात आली आणि विष्णू सावरा यांची पुन्हा आदिवासी विकास मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. यासोबतच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही विष्णू सावरा यांना मिळाले.

हेही वाचा - नालासोपाऱ्यात सांडपाण्याची समस्या जटिल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हेही वाचा - पालघरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकाने बाजारपेठा बंद; एसटी, रिक्षा सेवा सुरू

Last Updated : Dec 10, 2020, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.