ETV Bharat / state

Savarkar Gaurav Yatra : ३० मार्च पासून भाजप सेना युतीकडून सावरकर गौरव यात्रा - BJP Sena alliance

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी 30 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत पालघर जिल्ह्यातील शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी सहभागी होऊन ही यात्रा यशस्वी करणार असल्याची घोषणा नंदकुमार पाटील यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत केली.

Savarkar Gaurav Yatra
Savarkar Gaurav Yatra
author img

By

Published : Mar 29, 2023, 10:03 PM IST

पालघर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभर 288 मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा युती शासनाकडून करण्यात आली होती. येत्या 30 मार्चपासून पालघर जिल्ह्यात या यात्रेला सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शिवसेना भाजप यांच्यातील पदाधिकारी या यात्रेत सहभागी होऊन ही यात्रा यशस्वी करणार असल्याची घोषणा नंदकुमार पाटील यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत केली.

सावरकरांच्या कार्याची ओळख : नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी 30 ते 6 एप्रिल 2023 पर्यंत सावरकर गौरव यात्रा चालणार आहे. याप्रसंगी बोलताना नंदकुमार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटावरती टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यांच्यासोबत युती तोडण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवावी? असे आव्हान त्यांनी केले आहे. सावरकरांचा अपमान सर्व भारतीयांचा अपमान आहे. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीरांचा अपमान होत आहे. एक वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मणिशंकर अय्यर यांनी टीका केली होती तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून थेट मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरे रस्त्यावरून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याची हिंमत दाखवणार का ? असा प्रश्न केला आहे.

288 मतदार संघात गौरव यात्रा : राज्यातील 288 मतदार संघात सावरकर गौरव यात्रा प्रवास करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेच्या समारोप होणार असल्याची माहिती नंदकुमार पाटील यांनी दिली. या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून महामंत्री विक्रांत पाटील मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यात्रेचे ठाणे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे व आमदार निलेश राणे काम बघणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच या यात्रेला यशस्वी करण्यासाठी शिवसेना व भाजप मधील सर्व पदाधिकारी करणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे, युवा अध्यक्ष समीर पाटील हे उपस्थित होते.

हेही वाचा - Funeral of Girish Bapat: खासदार गिरीश बापट अनंतात विलिन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.