ETV Bharat / state

गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र, जमावाने कोणाचे ऐकले नाही - सरपंच - gadchinchle sarpanch

पालघरमधील गडचिंचले हत्या प्रकरणाबाबत आता सरपंच चित्रा चौधरी यांनी मौन सोडले आहे. त्या म्हणाल्या, पोलीस येईपर्यंत ३ तास मी त्यांना वाचविले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांसमोर तिन्ही व्यक्तींची हत्या करण्यात आली.

sarpanch chitra chaudhari  गडचिंचले हत्या प्रकरण पालघर  gadchinchle murder case  gadchinchle sarpanch  गडचिंचले सरपंच
गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र, जमावाने कोणाचे ऐकले नाही - सरपंच
author img

By

Published : Apr 24, 2020, 1:22 PM IST

पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने दरोडेखोर समजून तिघांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा तपास सीआयडी सोपवला आहे. मारहाण होत असलेल्या तिघांना वाचविण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, जमावाने कोणाचे ऐकले नाही, असे गडचिंचलेच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी सांगितले आहे.

गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र, जमावाने कोणाचे ऐकले नाही - सरपंच

घटनेच्या दिवशी गावात मोठा जमाव जमला असून काही प्रवाशांना मारहाण केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चार-पाचशे लोकांचा जमाव तेथे जमला होता. गावात चोर आणि दरोडेखोर मुले पळवायला आले आहेत, असे सांगत गावकरी गाडीत असलेल्या तिघांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते. गाडीतील प्रवासी गाडीचे दरवाजे बंद करून बसले होते. त्यांना नाव विचारले. मात्र, त्यांनी दरवाजे काही उघडले नाही. यानंतर चिडलेल्या जमावाने त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. तेव्हा मी जमावाला रोखले. पोलीस येईपर्यंत तीन तास या प्रवाशांना जमावापासून वाचविले. त्यावेळी जमावाने आम्हाला शिवीगाळ केली आणि मारण्याच्या धमक्या दिल्या. पोलीस आल्यानंतर त्या प्रवाशांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर मी चौकीच्या मागच्या दाराने घरी गेले. मात्र, काहीवेळातच पोलीस मला पुन्हा बोलवायला घरी आले. यानंतर मी पुन्हा घटनास्थळी गेले तेव्हा जमावाने पोलिसांसमोर तिन्ही व्यक्तींची हत्या केली, असे गडचिंचलेच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी सांगितले आहे.

काय आहे गडचिंचले हत्या प्रकरण -

गेल्या १६ तारखेला रात्री दोन व्यक्ती चारचाकीने गुजरातमध्ये जात होते. त्यांची दादरा-नगर हवेली आणि पालघरच्या सीमेवर गडचिंगले हे गाव आहे. या गावात अनेक दिवसांपासून चोर येऊन मुले पळवतात, अशी अफवा आहे. त्यामुळे त्यांनी या व्यक्तींसह त्यांच्या चालकाला चोर समजून त्यांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी पहाटे ५ वाजतापासून जंगलात आरोपींचा शोध घेतला. यामध्ये १०१ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये ९ आरोपी १८ वर्षांखालील असून त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर अन्य १०१ आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.