विरार (पालघर) - विरार पश्चिम येथील विजयवल्लभ रुग्णालयाला लागून घडलेली घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असली तरी या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
बोलताना केंद्रीय राज्यमंत्री आठवले रामदास आठवले यांनी शनिवारी (दि. 24 एप्रिल) सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपात तथ्य नाही. या दुघर्टना रोखण्यात राज्य सरकार कमी पडेल आहे. त्यामुळेच आपण न्यायालयीन चौकशीची मागणी केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारनेही राज्याला आवश्यक तो लसीचा पुरवठा केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - जीना मरना तेरे संग... विरार रुग्णालय आगीत पतीचा मृत्यू, वृत्त समजताच पत्नीचे हृदयविकाराने निधन