ETV Bharat / state

स्तुत्य उपक्रप.. मुलीच्या लग्नातील आहेराची धनराशी दिली सैनिक फंडाला

वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत द्यायची, या भावनेतून राजपूत यांनी विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला देण्याचे त्यांनी ठरवले

लग्नातील क्षण
author img

By

Published : Mar 4, 2019, 6:25 PM IST

पालघर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोककळा पसरली. या दु:खाच्या वेळी मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच सैनिकांकरिता देऊन डहाणू येथील राजपूत कुटुंबियांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

वडील अशोक राजपूत

डहाणू तालुक्यातील सरावली येथील अशोक राजपूत हे एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची थोरली मुलगी भावना (वय २५) हिचा विवाह कोडिणार गावातील केतुल वालजीभाई जेठवा (वय २६) यांच्याशी २४ फेब्रुवारीला ठरला. लगीनघाई सुरू असताना १४ फेब्रुवारीला पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ सीआरपीएफ जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात शोक लहर उमटली होती. लग्नकार्याच्या तोंडावर अशी दुर्दैवी घटना घडल्याने राजपूत कुटुंबीयही हळहळून गेले. हा अनोखा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला असून राजपूत कुटुंबियांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत द्यायची, या भावनेतून राजपूत यांनी विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला देण्याचे त्यांनी ठरवले. राजपूत कुटुंबियांनी घेतलेले शहरातील नागरिकांनाही त्यांची पाठ थोपटली. दरम्यान, या लग्नात आहेर देणार्‍या प्रत्येकाच्या नावाची नोंद एका रजिस्टरवर करण्यात आली असून त्या समोर रक्कमही नोंदविण्यात आली.

केवळ सैंनिकांमुळेच भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. या भावनेतून आहेराची धनराशी सैनिक फंडाला देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरचे काही रिती-रिजाव अद्याप बाकी आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर आहेर देणार्‍यांची यादी आणि धनराशी जिल्हाधिकार्‍यांमार्फत इंडियन आर्मी रिलीफ फंडमध्ये जमा केले जाईल, असे अशोक यांनी

undefined

Intro:डहाणू येथील अशोक राजपूत व कुटुंबियांनी मुलीच्या लग्नातील आहेराची धनराशी दिली सैनिक फंडात: निर्णयाचे सर्वत्र कौतुकBody:डहाणू येथील अशोक राजपूत व कुटुंबियांनी मुलीच्या लग्नातील आहेराची धनराशी दिली सैनिक फंडात: निर्णयाचे सर्वत्र कौतुक

नमित पाटील,
पालघर,दि.4/2/2019,

पुलवामा येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभर . दरम्यान आपल्या सुख:करिता देहाची बाजी लावणार्‍या सैनिकांकरीता मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच देण्याचा निर्णय डहाणू शहरातील सरावली येथल्या अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांच्या या देशप्रेमाविषयी सर्वत्र कौतुक होत आहे.

डहाणू तालुक्यातील सरावली, मानफोडपाडा येथील हे राजपूत कुटुंबीय रहिवासी आहेत. अशोक राजपूत हे एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची थोरली मुलगी भावना (25) हिचा विवाह सेलवासाच्या कोडिणार गावातील वालजीभाई जेठवा यांच्या इंजिनीयर मुलगा केतुल(26) यांच्याशी 24 फेब्रुवारी रोजी ठरला. लगीनघाई सुरू असताना 14 फेब्रुवारी रोजी पुलावामा येथील दहशतवादी हल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. लग्नकार्याच्या तोंडावर अशी दुर्दैवी घटना घडल्याने राजपूत कुटुंबीयही हळहळून गेले.

आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्या करिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला. तो पत्नी सुधा, आई मंगुबाई, मुलगी भावना व स्नेहल आणि मुलगा स्वप्नील यांना सांगितले. त्यानंतर नवर्‍याकडील मंडळींना कळविले. या सर्वांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी उभयंत्यांचा विवाह सोहळा पार पडला. किंबहुना राजपूत कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती शहरातील नागरिकांनाही कळली त्यांनी या कुटुंबियांची पाठ थोपटली. दरम्यान या लग्नात आहेर देणार्‍या प्रत्येकाच्या नावाची नोंद एका रजिस्टरवर केली असून त्या समोर रक्कमही नोंदविण्यात येणार आहे. या यादीसह संपूर्ण धनराशी पालघर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सैनिक रिलीफ फंडाला धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात येईल असे राजपूत म्हणाले. माझ्या या निर्णयात कुटुंबियव व मित्र परिवाराचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनाही या माध्यमातून देशसेवेत खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मिळेल हा उदात्त हेतु त्यांनी बोलून दाखवला. किमान दीडलक्षरूपयांचा आहेर येणे अपेक्षित आहे. जरी 2 किंवा 3 लाखांच्या घरात रक्कम गेली, तरीही पै अन पै सैनिकांच्या नावेच जमा केली जाईल अशी पुष्टीहि त्यांनी जोडली. हा अनोखा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला असून राजपूत कुटुंबियांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.

“ केवळ सैंनिकांमुळेच भारतीय नागरिक सुरक्षित आहेत, या भावनेतून आहेराची धनराशी सैनिक फंडाला देण्याचा निर्णय कुटुंबियांच्या चर्चेनंतर घेतला. लग्नानंतरचे काही रिती-रिजाव अद्याप बाकी आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर आहेर देणार्‍यांची नावं व रक्कम असलेली यादी आणि धनराशी जिल्हाधिकार्‍यां मार्फत इंडियन आर्मी रिलीफ फंड मध्ये जमा केली जाईल.” अशोक राजपूत(वधूचे वडील, डहाणू, सरावली)

Byte- 1. अशोक राजपूत- वधूचे वडील
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.