पालघर - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज अचानक पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कमला लाईफ सायन्सेस आणि नेप्रड या रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट दिली. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून, रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादनाबाबत आढावा घेतला.
रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्याचे आवाहन
राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज अचानक तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कमला लाईफ सायन्सेस आणि नेप्रड या रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादन क्षमतेचा आढावा घेतला. कंपनीने रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवावे असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेश : कोरोना रुग्णाचा मृतदेह मागणाऱ्या नातेवाईकाला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मारहाण